kinwat today news

उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे आगामी सण-उत्सव तसेच बकरी ईद,अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त येथे दिनांक 28 रोजी शांतता कमिटीची बैठक संपन्न

किनवट :(प्रतिनीधी)
उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे आगामी सण-उत्सव तसेच बकरी ईद,अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त येथे दिनांक 28 रोजी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली असून कोरोना वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर बकरी ईद प्रतीकात्मक रित्या साजरी करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनी केले आहे.

तहसीलदार उत्तम कागणे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी पो. नी मारुती थोरात मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, पशु वैद्यकीय अधिकारी एस. एन. आडपोड, भाजपाचे जेष्ट नेते दिनकर चाडावार, उपनगराध्यक्ष अजय चाडावर, नगरसेवक जहीर खान, माजी नगराध्यक्ष साजीद खान, के. मूर्ती, पत्रकार गोकुळ भवरे, दुर्गादास राठोड, अनिल भंडारे, मलीक चव्हाण, बाळकृष्ण कदम, दत्ता जायभाये, केशव डहाके, गोविंद पांपटवार, परमेेशर गाडेकर, बोधमवाड, हबीब चव्हाण, मुफ्ती तन्वीर, हाफिज सैफ, हाफिज युसूफ, सुबहान चव्हाण, झहीर खान, उपसरपंच सलीम भाई, अरशद खान आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना नाईक म्हणाले की, कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपणास खबरदारी घेणे आवश्यक असुन शक्यतो बकरी ईद प्रतीकात्मक रित्या साजरी करावी. यामध्ये पोलीस प्रशासन, गरपरिषद, ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियम व परवानगी नुसार बकर्‍यांचा बळी देण्यात यावे. तसेच खाटीक व मदतनीस यांचे नॉन कोविड प्रमाणपत्र आवश्यक असेल. जर वैयक्तीक रित्या ज्या ठिकाणी बकऱ्याचा बळी देण्यात येणार आहे तेथील शेजार्‍यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असुन प्लास्टिक पडदा लावुन आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. सार्वजनिक नमाज पठण बंद असल्याचे त्यांनी सांगीतले. या बैठकीस उपस्थित झाल्याबद्दल तहसीलदार उत्तम कांगणे यांनी सर्वांचे आभार मानले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

3 thoughts on “उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे आगामी सण-उत्सव तसेच बकरी ईद,अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त येथे दिनांक 28 रोजी शांतता कमिटीची बैठक संपन्न

Leave a Reply