kinwat today news

लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्यापुण्यस्मरणा निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न.

किनवट टुडे न्युज ।।
आज माजी मंत्री ग्रामविकास जलसंधारण महीला व बालविकास मा.ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून पोलिस स्टेशन किनवट येथे कोरोना महामारीमध्ये जिवाची बाजी लावून कोरोनाशी झुंज देत देशाचे रक्षण करणार्या कोरोना वाॅरियर्स पोलीस बांधवांना हैंड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले!

पोलीस स्टेशन किनवट कोरोना वाॅरियर्स पोलीस बांधवांचे प्रतिनिधी म्हणून पोलीस निरीक्षक मा.थोरात साहेब, API मा.कांबळे साहेब, PSI मा. पवार साहेब, पोलीस कर्मचारी श्री सिध्दार्थ कागणे साहेब, श्री चौधरी साहेब,श्री संदुपटलेवाड साहेब,श्री पाटोदे साहेब व इतर पोलीस कर्मचारी बांधवांना वाटप करण्यात आले!

यावेळी शिवसेना किनवट तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष संदिप सोपानराव केंद्रे,
सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्धा केंद्रे ,
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विमुक्त आघाडी मा. बिभीषण पाळवदे ,खा.साहेबांचे PA सुनील गरड पाटील,प्रा.श्री गोवर्धन लांब ,भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारीणी सदस्य बंटी भाऊ फड,बोधडीचे उपसरपंच विष्णु भाऊ दराडे, सामाजिक कार्यकर्ते रामकिशन कागणे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता जायभाये ,
ज्येष्ठ पत्रकार अनिल भंडारे ,सामाजिक कार्यकर्ते रवि भाऊ चव्हाण,शनिवारपेठचे सरपंच राजु भाऊ माहुरे,सामाजिक कार्यकर्ते शेख शाकिर भाई, मदनापूरचे ग्रा पं सदस्य ज्ञानेश्वर डाखोरे, सामाजिक युवा कार्यकर्ते गणेश भाऊ कराड,सामाजिक कार्यकर्त्या भावनाताई दिक्षीत,सामाजिक कार्यकर्ते गोविंद तिरमनवार,बालाजी केंद्रे, ज्ञानेश्वर भाऊ फड, मारोती भाऊ केंद्रे, लहाने सर, रामकिशन केंद्रे सर, योगेश जायभाये रूपेश दाडे, यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली!

सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे प्रतिनिधी म्हणून रामकिशन कागणे यांनी केले तर पोलीस बांधवांचे प्रतिनिधी म्हणून या समाज उपयोगी स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन पोलीस स्टेशन किनवटचे पोलीस निरीक्षक मा. थोरात साहेबांनी केले .
सदरील कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान किनवट-माहूर च्या वतीने प्रा. गोवर्धन लांब ,प्रा. बिभीषण पाळवदे ,सामाजिक कार्यकर्ते रामकिशन कागणे आणिसामाजिक कार्यकर्ते बंटी भाऊ फड यांच्या वतीने करण्यात आले होते!

लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि महान क्रांतीकारक टिपू सुलतान बिग्रेड च्या संयुक्त विद्यमाने देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या पुण्यस्मरणा निमीत्त किनवट येथील डाॅ कलाम साहेब चौक येथे भारतरत्न अब्दुल कलाम साहेबांना आदरांजली वाहण्यात आली. सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून रस्त्याच्या कडेला असलेले फळे, भाजीपाला विक्रेते, चर्मकार बांधव, ढकल गाड्यावर सामान विक्रेते यांना हैंड सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून शेख शाकीर भाई (तालुका अध्यक्ष टिपु सुलतान ब्रिगेड ),रामकिशन कागणे ,जाकीर सर (संचालक व्हिजन अकॅडमी),शेख तौसीफ,
मौलाना करीमोद्दीन ,नासीर तगाले सर ,मोहसिन खान, इशरत शेख आदी उपस्थित होते.
रामकिशन कागणे यांनी भारतरत्न डॉ कलाम साहेबां बदल प्रास्ताविक केले तर शेख शाकीर भाई यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्यापुण्यस्मरणा निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply