kinwat today news

पबजी’ खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा दुर्दैवी मृत्यू…. माहूर तालुक्यातील म. पार्डी येथील दुर्दैवी घटना…!

श्रीक्षेञ माहुर /(25 जुलै)

स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन गेमचे शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातही फँड वाढत असताना मोबाईलवर पबजी नामक गेम खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माहूर तालुक्यात घडली असून तरूणावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करताना ‘पबजी’ सारख्या घातक गेमवर शासनानेे बंदी घालावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.


माहूर तालुक्यातील मौजे मछींद्र पार्डी येथील तरूण राजेश नंदू राठोड वय १८ वर्षे हा तरूण आज (दि. २५ जुलै) रोजी आपल्या घराशेजारी मोबाईलवर पबजी नामक मोबाईल गेम खेळत बसला होता. त्यावेळी वडील व घरातील इतर मंडळी आपापल्या दैनंदीन कामात व्यस्त असल्याने राजेशकडे कुणाचे लक्ष नव्हते… राजेश हा गेम खेळताना अचानक कधी गतप्राण झाला हे कुणाच्याही लक्षात आले नाही. दरम्यान राजेश हा कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याचे त्याच्या वडीलांच्या लक्षात आल्यानंतर झालेल्या आरडाओरड्याने संपुर्ण गाव गोळा झाले होते. गेम खेळताना डिप्रेशन मध्ये गेल्याने हृदयविकाराचा धक्का आला असावा त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात आली आहे.
“विशेष राजेश हा तरूण पबजीच्या एवढ्या आहारी गेला होता की, येथे मोबाईल नेटवर्क कमजोर असल्याने पुरेसे नेटवर्क मिळविण्यासाठी राजेश हा कधी कधी झाडावर बसून देखील पबजी गेम खेळताना त्यास अनेकांनी पाहीले असल्याचे बोलूूून दाखवले आहे.”
तर मयत राजेश ची अवस्था पाहता ऐन ‘नागपंचमी’ च्या दिवशी घडलेल्या या अन:पेक्षीत घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अत्यंत शोकाकूल वातावरणात राजेशच्या पार्थीवावर म. पार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असूूून अशा घातक ऑनलाईन गेम्सवर शासनाने तातडीने बंदी घालावी अशी मागणी होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “पबजी’ खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा दुर्दैवी मृत्यू…. माहूर तालुक्यातील म. पार्डी येथील दुर्दैवी घटना…!

Leave a Reply