kinwat today news

शेतक-यांना फवसणा-या राज्य सरकारचे चे नाव महाविकास आघाडी नसुन महाबिघाडी असे ठेवले पाहिजे- भाजपा ता.अध्यक्ष संदिप केंद्रे

किनवट ता.प्र दि २७ “शेतक-यांना खत बांधावर देऊ” हि घोषणा देऊन शेतक-यांना फवसणा-या राज्य सरकारने स्वतः चे नाव महाविकास आघाडी असे ठेवले आहे परंतु ते महाविकास आघाडी नसुन महाबिघाडी असे ठेवले पाहिजे असा घाणाघात भारतीय जनता पक्षाचे ता.अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी केला आहे.
       किनवट तालुक्यातील शेतक-यांना युरीया व तत्सम खते उपलब्ध होत नाही आहे त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे अशा आरोप ही भाजपचे तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी केला आहे
       २०२० या वर्षाच्या सुरवातीपासुनच शेतक-यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे यात सुरवातील अतिवृष्टी नंतर कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने फळ उत्पादक शेतक-यांचे झालेले नुकसान त्यानंतर पावसाने मारलेली दडी तर पेरलेले बियाणे हे वांजोटे निघाले त्यामुळे शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली एवढ्या समस्याचा सामना करता कसेबसे शेतक-यांनी खरीप हंगामातील आपले पिक जगवले त्यानंतर आता शासनाच्या दिरंगाई व निष्क्रीय प्रशासनामुळे शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे शासनाच्या या निष्क्रीय कारभारा विरुध्द जनआंदोलन उभारण्याचा इशारा किनवट तालुका भाजप च्या वतीने देण्यात येत आला आहे.
       शासनांने शेतक-यांना युरीया खताचा पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शासनाविरुध्द मोठे जनआंदोलन शेतक-यांना सोबत घेऊन काढण्यात येईल असा इशाराही यावेळी बोलतांना भाजप चे ता. अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी दिला आहे तर यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले कि राज्यातील जनादेश हा महायुतीच्या बाजुने असुन हे राज्यात अभद्र आघाडीकरुन आलेले सरकार हे अनैतिक असुन त्यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा कोणताही अधिकार नाही कोरोना विषाणुच्या नावावर प्रशासनातील अकार्यक्षमपणा लपवण्याचा प्रकार सध्या चालु असुन राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलचे सरकार आहे मुख्यमंत्री हे अपघाताने राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसले आहे त्याठीकाणी बसणे हि त्यांची मजबुरी आहे त्यामुळे तिन्ही ही पक्षाने आपल्या विचारधारेला तिलांजली देऊन एकमेकांसोबत जुळवुन घेतले आहे ते सत्तेच्या लालसेने तिथे बसले असुन लोकांचे प्रश्न सोडवने हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट नाही अशा अभद्र सरकार कडुन जनतेने जास्त अपेक्षा ठेऊ नये परंतु शासनाने शेतक-यांना वा-यांवर सोडवु नये अन्यथा भारतीय जनता पक्ष शेतक-यांचे प्रश्न घेउन रस्त्यावर उतरुन शासनाला भानावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे ही त्यांनी यावेळी पत्रकांरांशी चर्चा करतांना सांगितले.
       

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “शेतक-यांना फवसणा-या राज्य सरकारचे चे नाव महाविकास आघाडी नसुन महाबिघाडी असे ठेवले पाहिजे- भाजपा ता.अध्यक्ष संदिप केंद्रे

Leave a Reply