घोटी येथील वाहून गेलेला पर्यायी पूल दुरुस्ती केल्यामुळे आज पासून हा मार्ग प्रवाशांसाठी झाला  खुला.

किनवट टुडे न्युज। ( दि.27):
किनवट पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील घोटी फाटा येथील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे गेल्या चार दिवसापासून शंभर गावचा संपर्क तुटलेला होता.परंतु सदरील पर्यायी पूल दुरुस्ती केल्यामुळे आज पासून हा मार्ग प्रवाशांना खुला झाला आहे.
किनवट तालुक्यातील कोठारी पासून माहूर तालुक्यातील धानोडा पर्यंत च्या महामार्गाचे काम सुरू असून या मार्गावरील घोटी येथील पुलाचे काम चालू आहे त्यामुळे प्रवाशांना पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्यात आली होती परंतु सदरील रस्ता हा थोड्याच पाण्याने वाहून गेला त्यामुळे गेल्या चार दिवस या मार्गावरील हजारो प्रवाशांचे हाल होत होते. सदरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे शंभर गावचा संपर्क किनवट शहराशी तुटलेला होता.तसेच विदर्भ व तेलंगणा राज्याचा ही संपर्क तुटलेला होता. सदरील रस्ताचे काम नांदेड येथील शारदा कन्स्ट्रक्शन ही कंपनी करीत आहे . येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार उत्तम कागणे यांनी सदरील पर्यायी पूल 8 तासात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

5 thoughts on “घोटी येथील वाहून गेलेला पर्यायी पूल दुरुस्ती केल्यामुळे आज पासून हा मार्ग प्रवाशांसाठी झाला खुला.

Comments are closed.