kinwat today news

दिव्यांग वृध्द, निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किनवट टुडे न्युज चे संपादक आनंद भालेराव यांना डाखोरे पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरव .

किनवट टुडे न्युज।(दि.15):
दिव्यांग वृध्द, निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जागतिक कोरोना संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दिव्यांगाच्या कल्याणासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकारांना कोरोना योद्धा प्रमाणपत्रा ने सन्मानित करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट टुडे न्युज चे संपादक आनंद भालेराव यांना दिव्यांग वृध्द, निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचे अध्यक्ष चपंतराव डाखोरे पाटील कुंचेलीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

दिव्यांग वृध्द, निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य संघटना अपंगाच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊन कार्य करीत आहे .अपंग व प्रशासन यातील दुवा म्हणून सदरील संघटना महाराष्ट्रभर कार्य करीत आहे व अपंगांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारावर वाचा फोडण्याचे काम करीत आहे . अपंगावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडण्याचे कार्य कोरोना काळातही इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया तालुका अध्यक्ष तथा किनवट टुडे न्यूज चे मुख्य संपादक आनंद भालेराव यांनी केलेले आहे. यामुळे आम्ही आपणास कोरोणा योद्धा म्हणून सन्मानित करत आहोत .असेच कार्य आपल्या हातून घडत राहो असे या शुभेच्छा नमूद करण्यात आले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “दिव्यांग वृध्द, निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किनवट टुडे न्युज चे संपादक आनंद भालेराव यांना डाखोरे पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरव .

Leave a Reply