kinwat today news

किनवट टुडे न्युज चे संपादक आनंद भालेराव व संपादक दत्ता जयभाये यांना अखिल भारतीय अपंग कामगार संघटना तर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित.

किनवट टुडे न्युज।(दि.15):
अखिल भारतीय अपंग कामगार संघटना यांच्यातर्फे जागतिक कोरोना संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दिव्यांगाच्या कल्याणासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकारांना कोरोना योद्धा प्रमाणपत्रा ने सन्मानित करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट टुडे न्युज चे संपादक आनंद भालेराव व वंजारी पुकार चे संपादक दत्ता जयभाये यांना अखिल भारतीय अपंग कामगार संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष कामगार क्रांतीसुर्य अरुण गव्हाणे उर्फ कालापाड पाटील यांच्या आदेशाने किनवटचे तालुका सचिव राज माहुरकर व शहरअध्यक्ष सलाम बागवान व यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अखिल भारतीय अपंग कामगार संघटना अपंगाच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊन कार्य करीत आहे .अपंग व प्रशासन यातील दुवा म्हणून सदरील संघटना महाराष्ट्रभर कार्य करीत आहे व अपंगांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारावर वाचा फोडण्याचे काम करीत आहे .

अपंगावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडण्याचे कार्य कोरोना काळातही इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया तालुका अध्यक्ष तथा किनवट टुडे न्यूज चे मुख्य संपादक आनंद भालेराव व दत्ता जयभाये यांनी केलेले आहे. यामुळे आम्ही आपणास कोरोणा योद्धा म्हणून सन्मानित करत आहोत .असेच कार्य आपल्या हातून घडत राहो असे या शुभेच्छा नमूद करण्यात आले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “किनवट टुडे न्युज चे संपादक आनंद भालेराव व संपादक दत्ता जयभाये यांना अखिल भारतीय अपंग कामगार संघटना तर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित.

Leave a Reply