kinwat today news

दिव्यांग मित्र अँपमधील दिव्यांगाची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करावी- चंपतराव डाकोरे

किनवट टुडे न्युज/नांदेड
दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून शासनाने दिव्यांग अॅप सुरू केले आहे . परंतू  दिव्यांग बांधव  सदरील अॅप डाऊनलोड करून माहिती भरण्यासाठी  असमर्थ असल्यामुळे प्रशासनाने प्रस्तूत प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी   दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे  संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे कुंचलीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे .

प्रशासनास  दिव्यांगांचे काही महत्व वाटत नसल्याने त्यांच्या पर्यंत ते पोहचत नाही . दिव्यांगांसाठी  अशा प्रकारे अॅप काढून त्यांची  दिशाभूल करण्याची कृती असल्याचा आरोप डाकोरे यांनी केला आहे .

कोरोना सारख्या महामारीने निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात दिव्यांग बांधवांचे  मोठे हाल होत असून  शासन निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने  त्याचा कांहीच उपयोग होत नसल्याचेही त्यांनी सांगितले . दि .२६ मार्च रोजी दिव्यांग आयुक्त पुणे यांनी लेखी आदेश  दिले आहेत . परंतू आजपर्यतही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्वल  त्यांनी खंत  व्यक्त केली .

दिव्यांग कायदा  सन २०१६  नुसार  दिव्यांगांना वेळेवर सवलती देणे बंधनकारक आहे . मात्र त्यांच्याकरीता   असलेल्या हक्काच्या वैयक्तिक पाच टक्के निधीपैकी केवळ एक वेळा हा निधी वाटप करण्यात आला आहे . तसेच दिव्यांगांशी संबंधीत निर्णयांची अंमलबजावणी करतांना दिव्यांग संघटनेला विचारात घेण्याचे वरिष्ठांचे लेखी आदेश असूनही कोणत्याही संघटनेस कांही कळविले जात नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे .

दरम्यान  संघटनेच्या वतीने शासनास  वारंवार  निवेदने  देऊन आणि आंदोलने केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांकरीता    ‘ दिव्यांग  मित्र ‘ नावाचे अॅप सुरु केले असले तरीही फारच कमी दिव्यांगांकडे अँड्राइड मोबाईल असल्याने त्यावर देखील मर्यादा येत आहेत .  त्याकरीता  सदरील अॅपमधील नोंदणी ही स्थानीक स्वराज्य संस्थामार्फत करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी  एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “दिव्यांग मित्र अँपमधील दिव्यांगाची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करावी- चंपतराव डाकोरे

Leave a Reply