kinwat today news

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ;आ.भीमराव केराम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी.

किनवट टुडे न्युज। (ता.25)

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे याकरिता किनवट माहूर चे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी दि 24 जुलै रोजी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठून मागणी केली आहे.

आपल्या प्रत्यकारी लेखण प्रतिभेने विविधांगी साहित्याद्वारे वर्गविग्रहाचे तत्वज्ञान वंचित व सर्व घटकापर्यंत पोहचविणारे लोकशाहीर आणि साहित्यरत्न श्री अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 1 ऑगस्ट 2019 रोजी होत आहे.
साहित्य व समाजकारण यात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सहभाग अग्रणी आहे. मागास समाजातून पुढे आलेल्या आदरणीय अण्णाभाऊ यांनी वंचित समाजाच्या व्यथा,वेदना आपल्या साहित्यकृतीतुन अतिशय परिणामकारक मांडल्या त्यांना मरणोत्तर” भारतरत्न” किताब देण्यासाठी राज्यमंत्री मंडळाने निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply