kinwat today news

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना “भारतरत्न” या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात यावे याकरिता आदरणीय लोकनेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मा.ना.नरहरी झिरवाळ उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी दिले निवेदन .

नाशिक :(24) साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना “भारतरत्न” या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात यावे याकरिता आदरणीय लोकनेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मा.ना.नरहरी झिरवाळ उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी निवेदन दिले.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून दिन-दलित,शोषित, पिडीत व कामगार वर्गाची व्यथा आपल्या साहित्यातून प्रखरपणे जगा समोर मांडून उपेक्षित,वंचित दुर्बल घटकांच्या न्याय व उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी मा.ना.नरहरी झिरवाळ उपाध्यक्ष,महाराष्ट्र विधानसभा यांनी मा.ना.उध्दव ठाकरे साहेब, मुंख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यानां दिलेल्या निवेदननाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत विनंती केली होती.
महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखक, साहित्यकार, अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी बाण्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेल्या योगदानामुळे क्रांती घडली होती. त्यांची 100 वी जयंती देशात मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी देशातील उपेक्षित, वंचित घटकांसह मागासवर्गाला उन्नतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारताचा सर्वोच्च सन्मान “भारतरत्न” देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी समाजातील सर्व थरातून होत आसल्यामुळे मा. ना. नरहरी झिरवाळ यांनी आदरणीय खा.पवार साहेबांना केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना “भारतरत्न” या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात यावे याकरिता आदरणीय लोकनेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मा.ना.नरहरी झिरवाळ उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी दिले निवेदन .

Leave a Reply