kinwat today news

किनवट माहूर या महामार्गावरील घोटी नजीकचा पर्यायी पूल गेला वाहून; तेलंगणा विदर्भ यासह माहूर,मोहपूर,कुपटी या मार्गावरील तुटला संपर्क; प्रवास ठप्प .

किनवट टुडे न्युज ।
किनवट पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर किनवट माहूर या महामार्गावरील घोटी नजीकचा पर्यायी पूल वाहून पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे तेलंगणा विदर्भ यासह माहूर,मोहपूर,कुपटी या मार्गावरील सर्व संपर्क तुटला असून प्रवास ठप्प झाला आहे.

कोठारी ते धनोरा या महामार्गाचे काम चालू असून घोटी व लोणी या मोठ्या पुलाचे बांधकाम चालू आहे.या ठिकाणी पर्यायी पूल करण्यात असला होता परंतु पावसाच्या पहिल्याच पाण्यात सदरील पर्यायी पूल वाहून गेला आहे.सदरील महामार्गाचे काम नांदेड च्या शारदा कन्स्ट्रक्शन या कंपनीचे आहे. उन्हाळ्यामध्ये या रस्त्यावर पूरा धुरळाच धुरळाला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आता पावसाळ्यात माती मिश्रीत मुरूम असल्यामुळे वाहन धारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.अनेक मोटारसायकल धारक प्रवासी घसरुन पडून जखमी होत आहेत.
तसेच लोणी व घोटी चे नदीपात्रात रुंद असल्याने मोठ्या पाण्यात मोठा अनर्थ होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या बाबींची गंभीर दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी.अशी प्रतिक्रिया समोर येत आहेत.
पर्यायी पुलाचे थातुरमातुर काम केल्यामुळेच आज या भागातील प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या कामाची चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी या भागातील जनते कडून होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “किनवट माहूर या महामार्गावरील घोटी नजीकचा पर्यायी पूल गेला वाहून; तेलंगणा विदर्भ यासह माहूर,मोहपूर,कुपटी या मार्गावरील तुटला संपर्क; प्रवास ठप्प .

Leave a Reply