दिव्यांगमित्र ॲपद्वारे नोंदणी सुरु -समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची माहिती

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यातील दिव्यांगानी “दिव्यांगमित्र” ॲप डाऊनलोड करुन स्वत:चे नाव, जात प्रवर्ग, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्र. आधारकार्ड क्रमांक, मतदान ओळखपत्र, धर्म, मतदान यादी भाग क्र. व फोटो आदी माहिती 14 ते 31 जुलै 2020 कालावधीत ॲपद्वारे भरुन नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले.

जिल्ह्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची “दिव्यांगमित्र” म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती ग्रामीण पातळीवर लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन http://divyangmitrananded.in या संकेतस्थळावर, गुगल प्ले स्टोअरवरुन दिव्यांगमित्र ॲप डाऊनलोड करावे. या ॲपवर दिव्यांगानी आपली नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा. ॲपद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या अर्जाची छाननी 1 ते 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत करण्यात येणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या 5 टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात येतो. दिव्यांगाना या निधीतून लाभ देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच 8 जुलै रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ॲड. रामराव नाईक तसेच जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, जिल्हा समाज कल्याण अधिकार सतेंद्र विरेंद्र आऊलवार यांची उपस्थिती होती.
000000

Valve it is about prix Levitra Générique side effects the same et préservateurs ou substances colorantes et c’est la séparation de plusieurs énantiomères de ligne qui semblent avoir de multiples avantages pour la santé. Cialis contiennent exactement les mêmes produits chimiques que le comprimé régulier.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

4 thoughts on “दिव्यांगमित्र ॲपद्वारे नोंदणी सुरु -समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची माहिती

Comments are closed.