kinwat today news

बळीराम पाटील महाविद्यालयाचा राहील भारवाणी 85.23 % गुण घेऊन 12 वी वाणिज्य शाखेतून तालुक्यातून प्रथम

किनवट : येथील बळीराम पाटील महाविद्यालयाचा राहील भारवाणी 85.23 % गुण घेऊन 12 वी वाणिज्य शाखेतून तालुक्यातून प्रथम आला असून विज्ञान व कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

12 वी विज्ञान शाखेचा निकाल 95 टक्के लागला असून शर्वरी प्रदीप अग्रवाल ही 78 टक्के गुण घेवून विज्ञान शाखेत प्रथम, सुदामनिया शाईरोज सलिम हिने 77.38 टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय आली तर रावल वासू हरीष हा 73.69 टक्के गुण प्राप्त करून तिसरा आला आहे.
12 वी वाणिज्य शाखेचा निकाल 95 टक्के लागला असून राहील बरकत भारवाणी हा 85.23 टक्के गुण घेवून महाविद्यालयातूनच नव्हे तर तालुक्यातून प्रथम आला आहे, दुर्गा सूधाकर भोयर ही 84 टक्के गुण घेवून व्दितीय तर आशिष मूरलीधर केंद्रे हा 83 टक्के गुण घेवून तृतीय आला आहे .
12 वी कला शाखेचा निकाल 69 टक्के लागला असून इंद्रजित गणेश राठोड हा 80 टक्के गुण घेवून प्रथम आला आहे. ऋतूजा प्रकाश चटलेवार ही 79.54 टक्के घेवून व्दितीय तर पूजा परसराम जाधव ही 77 . 54 टक्के गुण घेवून तृतीय आली आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड , उपाध्यक्ष गंगारेडडी बैनमवार , सचिव शंकरराव चाडावार , कोषाध्यक्ष जसवंतसिंग सोखी , प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्माणीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, प्रा. विजय खूपस, डॉ. रत्ना कोमावार, प्रा. चंदेले, प्रा. दमकोंडवार, प्रा. पुरुषोत्तम येरडलावा, प्रा. डी. टी. चाटे, प्रा. काझी सूजाउद्यीन, प्रा. डॉ. लता पेंडलवाड, प्रा. राघू , प्रा. विजया खामनकर, प्रा. शिल्पा सर्पे, प्रा. श्रृती सुरोसे, दीपक खंदारे , महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिनी अभिनंदन केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “बळीराम पाटील महाविद्यालयाचा राहील भारवाणी 85.23 % गुण घेऊन 12 वी वाणिज्य शाखेतून तालुक्यातून प्रथम

Leave a Reply