kinwat today news

किनवट माहूर तालुक्यातील जनतेनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी संपली तरी सोशल डिष्टांसिंगचे पालन करावे-माजी आ.प्रदीप नाईक

किनवट टुडे न्युज(आनंद भालेराव): किनवट जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा वाढत असतांना किनवट माहूर तालुक्यातील जनतेनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी संपली तरी सोशल डिष्टांसिंगचे पालन करावे. दोन्ही तालुक्यातील नियुक्त वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने गाव व शहरातील सरपंच ,नगराध्यक्ष आणि कोरोना दक्षता समितीने गावातून बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तपासून घ्यावे तरच कोरोनावर मात करता येईल अशी अपेक्षा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केली आहे.

किनवट माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे पाय कोरोना विरोधात लढणाऱ्या प्रशासकीय यंत्रणानी पसरवू दिले नाही हे यौध्ये ढाल म्हणून लढत आहेत मात्र लॉक डाऊन घोषित असतांनाही लोक गावातून बाहेरगावी कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त बाहेरगावी जात आहेत बाहेर गावाहून येत आहेत त्याचबरोबर किनवट माहूर तालुक्यात नियुक्त वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी हे जिल्ह्याच्या ठिकाणी राहून कर्तव्य पार पाडत आहेत अशा येण्याजाण्याने गाव असो शहर असो कोरोनाचा धोका होऊ शकतो अशा अपंडाऊन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना व गावातून बाहेरगावी पुसद यवतमाळ ,नांदेड ,आदीलाबाद येथे जाणाऱ्या लोकांना गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व कोरोना दक्षता समितीने तसेच शहरात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व कोरोना विरोधात लढणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंध घालावा अशी अपेक्षा माजी आमदार नाईक यांनी किनवट टुडे न्युज चे संपादक आनंद भालेराव यांच्याशी मोबाईल फोनवरून व्यक्त केली आहे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “किनवट माहूर तालुक्यातील जनतेनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी संपली तरी सोशल डिष्टांसिंगचे पालन करावे-माजी आ.प्रदीप नाईक

Leave a Reply