kinwat today news

शिवणी येथील शेतकरी महीलेचे शेतातील आखाडयावर सर्पदंशाने झाले निधन

किनवट – (ता.प्र.) तालुक्यातील शिवणी येथील शेतकरी महीलेचे शेतातील आखाडयावर सर्पदंशाने निधन झाले आहे. याबद्दल गावकऱ्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर असे कि, जनाबाई नारायण क-हाळे वय वर्ष 55 ह्या दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 8.00 वाजता चहा करण्यासाठी आपल्याच शेतातील आखाडयावर बाजूला असलेल्या तुराटया व काही सरपण (लाकडे) आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका विषारी जातीच्या सापाने त्यांच्या डाव्या पायाला डंक मारला त्या ओरडल्याने ही बाब महीलेचा भाऊ जयवंतराव भिसे यांच्या निर्दशनास आल्याने बहीणीस बैल गाडीत टाकून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणी येथे आणले वैद्यकीय अधिकारी डॉ. पोघे यांनी तपासणी करून मुत घोषित केले. व शवविच्छेदन करून मुतदेह परीवारास सुपूर्द केले. सदरील घटनेची माहिती इस्लापुर पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून शिवणी बिटचे जमादार एन.एन. तांबरे यांनी पंचनामा करून आक्समित मुत्यूची नोंद करण्यात केली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “शिवणी येथील शेतकरी महीलेचे शेतातील आखाडयावर सर्पदंशाने झाले निधन

Leave a Reply