kinwat today news

घूगूस येथे शासकीय मुलींच्या वस्तीगृहच्या मागणीसाठी सत्यनारायण डकरे यांनी दिले आमदार जोगरेकराकडे निवेदन.

घूघुस: घूगूस येथिल प्लॉट न. 255 मधील जागेत शासकीय वस्तीगृह मिळण्यासाठी गेल्या आठ वर्षापासून निवेदने देऊन 2012 पासून सतत पाठपुरावा सुरू असून आजपर्यंत या मागणीचा विचार झालेला नाही. तरी आमदार जोरगेकर साहेब यांनी शासकीय मुलींचे वस्तीगृह आणून येथे गरीब विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष सत्यनारायण ठाकरे यांनी केली आहे.
शासकीय मुलींचे वस्तीगृह बांधण्यासाठी लागणारे तीन हजार स्क्वेअर फूट जागा शासनाने देऊन या जागेवर मुलींचे वस्तीग्रह बांधण्यात यावे अशी येथील जनतेची मागणी आहे . या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष सत्यनारायण डकरे, संजय भालेराव, श्रीनिवास गोसंकुला, शहराध्यक्ष बुध्दराज कांबळे,महिला ता.अध्यक्षा सौ.सुशीला डकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “घूगूस येथे शासकीय मुलींच्या वस्तीगृहच्या मागणीसाठी सत्यनारायण डकरे यांनी दिले आमदार जोगरेकराकडे निवेदन.

Leave a Reply