kinwat today news

गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी येथे गुणवंतांचा सत्कार..

माहूर (प्रतिनिधी )
सीबीएसई दहावी बोर्डचा आणि बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून टाकळी येथील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने श्री.विनायक राजु मुसळे यांनी आयोजित केला होता. हा सत्कार सोहळा हनुमान मंदिराच्या सभागृहात सर्व सोशल नियम पाळत पार पडला..

या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शका खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी ओडियो क्लिप सहाय्याने गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन व मार्गदर्शन केले.. व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरिक्षक श्री.लक्ष्मण राख साहेब होते. यावेळी माजी.जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जि.प सदस्य समाधान जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच मंचावर दाऊशिंग जाधव,बाबूखा फारुखी,दत्ता काळे,नामदेव पाटील, जितू चोले हे उपस्थित होते. यावेळी 10 वी CBSE बोर्डाच्या परिक्षेमध्ये उतिर्ण झालेले टाकळी येथील गुणांवत विद्यार्थी चि.विशाल समाधान चोले (95.80%) व चि.परसराम लक्ष्मण घुले यांनी (91.35%)यांच विशेष अभिनंदन करुन त्यांचा पालकांना वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.

याचबरोबर 12 वी राज्य बोर्डाच्या परिक्षेत उतिर्ण झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी कू.पूनम काळे,आरती आगरकर, निकीता घाळवट, व चि.अमर शेंडे,अभय राऊत,साईनाथ राऊत, कृष्णा मुधोळकर,मोसीम पठाण,ज्ञानेश्वर जाधव,या सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आपल्या भाषणात पोलीस निरीक्षक राख म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आपण त्याच प्राशन केलं तर जीवनात आपण नकीच यश संपादन करू. तर समाधान जाधव यांनी मार्गदर्शन करताना विध्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला की विद्यार्थी मित्रांनी शिक्षण घेऊन आई वडिलांचे नाव उज्वल करावे.आणि काही अडचणी आल्या तर माझ्याशी संपर्क करा मी मदत करिन असं मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी अध्यक्ष भाषणात तहसीलदार वरनगावकर साहेब हे म्हणाले की पालकानी विध्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना ज्या विषयात आवड आहे ते समजून घ्या आणि त्याच्या आवडी नुसार त्याना शिक्षण घेण्यासाठी मदत करा. तो विद्यार्थी तुमचं आणि तुमच्या गावाचं नाव नकीच उज्वल करेल. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्या सोबत पालकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा,विश्वासराव जाधव यांनी केले तर प्रास्ताविक श्री.लक्ष्मण घुले आणि सर्वांचे आभार चि.ओम मुसळे यांनी मानले..

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply