kinwat today news

सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाची यशाची परंपरा कायम, विज्ञान शाखेचा 100ंं/. टक्के निकाल

किनवट : (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर विद्यालय संस्थेचा निकाल दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उत्तुंग भरारी घेत लागला असून विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा 86 टक्के निकाल लागला असून या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व्यंकटरावजी नेम्मनीवार यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत येथील शिक्षक प्राध्यापक वर्गाचे कौतुक केले आहे.

किनवट तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या सरस्वती विद्या मंदिर विद्यालय संस्थेचा निकाल यावर्षी चांगला लागला असून विज्ञान शाखेमध्ये एकूण 107 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच कला शाखेमध्ये 188 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर 162 विद्यार्थ्यांना यश मिळत उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचे विशेष प्राविण्य यामध्ये दोनपेलीवार कुस्तीजा 89% तर जय पद्मावार याने 86.76 टक्के, राजलक्ष्मी कंचर्लावार 85.68 टक्के, मकरंद ठाकरे या विद्यार्थ्यांनी 80.92 श्रेया उत्तरवार या विद्यार्थिनी विशेष प्राविण्य मिळवले तसेच कला शाखेचे सोनल वाठोरे या विद्यार्थिनीने 88.17 टक्के, कालावार कल्याणी 76.92 टक्के, पल्लवी रावसाहेब निलेवाड 75.69 टक्के, शारदा दत्ता केंद्रे 75.38 टक्के, गणेश पोटे 73 टक्के, या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मनीवार, मुख्याध्यापक मुकुंदराव तिरमनवार व सर्व शिक्षकवृंद यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाची यशाची परंपरा कायम, विज्ञान शाखेचा 100ंं/. टक्के निकाल

Leave a Reply