kinwat today news

बोगस सोयाबीन बियाणे शेतात उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यास लाखो रुपयांचा फटका.

किनवट टुडे न्युज: पहिलेच जगावर कोरोना महामारी चे मोठे संकट असताना व जिकडे तिकडे शेतकरी लॉकडाऊन मध्ये असताना शेतामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नसल्यामुळे आधीच विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.
किनवट व माहूर तालुक्यात बोगस बियाणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यास लाखो रुपयांचा फटका बसला आहे .याची चौकशी करून झालेल्या नुकसानीची बियाणे कंपनीकडून वसुली करून देण्यात शेतकऱ्यांना यावे तसेच बोगस बियाणे विकणाऱ्या व तयार करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी समाजमाध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
तसेच सध्या युरिया खताचा कृत्रिम तुटवडा करून जादा दराने (ब्लॅक)ने ते विक्री करणाऱ्या दुकांदारवर कार्यवाही करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील कृषि अधिकारी कोठे आहेत? त्यांनी आजपर्यंत किती दुकानदारांची चौकशी केली? किती दोषी आढळून आले. या बद्दल माहिती द्यावी.अशी जनतेतुन मागणी होत आहे.
या गंभीर बाबीची लोकप्रतिनिधी नी दाखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.अशी आशा शेतकरी बांधव बाळगून आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “बोगस सोयाबीन बियाणे शेतात उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यास लाखो रुपयांचा फटका.

Leave a Reply