kinwat today news

शिवणी व अप्पारावपेठ येथील आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण

शिवणी येथील प्रा.आ.केंद्रातील ‘देशभक्ती पार्क’ बनले आकर्षनाचे विषय
वैद्यकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांचे केले कौतुक

शिवणी (प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील शिवणी व अप्पारावपेठ येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात दि.१५ जुलै रोजी अटल आनंद घनवन प्रकल्प अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी मा. शरद कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
मागील दहा वर्षा पूर्वी पर्यावरण संदर्भात गामभिर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गामभिर्याने भोगावे लागतील याची कल्पना नव्हती मात्र आता पुढच्या पिढी साठी पर्यावरनाचा ऱ्हास टाळणे या पिढीचे कर्त्यव्य असून वृक्ष लागवडीच्या मोहिमेत प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे मत व्यक्त केले आणि मियावाकी वनस्पती शास्त्रज्ञ जपान यांच्या संकल्पनेतून जगभर ही संकल्पना राबवली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहित उपस्थित सर्व अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी उ. मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता अभियान दिलीप इंगोले,उ. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा व्ही.आर.पाटील.उ. मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत व्ही.आर.कोंडेकर, गट विकास अधिकारी सुभाष धनवे,ता. आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे,गटशिक्षणाधिकारी सुभाष पवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. के.एस. मुंडे. डॉ. यु.ए पोघे. डॉ. आर.के टोनपे औ. नी. अधिकारी पी. एम. गिरासे.वि.अधिकारी पंचायत रेनेवाड,विस्तार अधिकारी पंचायत उडपेवार,व तांत्रिक अधिकारी पं.स.किनवट येथील सचिन येरेवार, डॉ हनवते, ग्रामविकास अधिकारी एस.बी.फुलारी शिवणी येथील सरपंच प्रतिनिधी दिगांबर बोंदरवाड पत्रकार भोजराज देशमुख प्रकाश कारलेवाड व गावातील अन्य निसर्ग प्रेमी उपस्थित होते वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाल्यानंतर येथील आरोग्य वर्धनी केंद्रा द्वारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून व श्रमदानातून निर्मिती करण्यात आलेल्या ‘देशभक्ती पार्क’ चे मु.का.अ. शरद कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आले.आणि पार्क परिसराची पाहणी केली’देशभक्ती पार्क’ हे शिवणी परिसरातल्या निसर्ग रम्य सौंन्दर्यात भर घालणारी असून या पार्क मध्ये जल संधारण कुंडी व नैसर्गिक पाण्याचा धबधबा निर्माण केले चिमणी पाखरं व इतर पक्षासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे या सोबतच पाण्याचा धबधबा (वाटर फॉल) एक आकर्षक विषय बनला आहे आणि विविध प्रकार चे औषधी वनस्पती झाडे व अनेक प्रकारचे फुले व फळाची झाडे असून बसण्यासाठी बाक(खुर्ची)असून मान्यवरांनी पाहणी केली व प्रशंसा ही केली
या देशभक्ती पार्क निर्माण व वृक्षारोपण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्रीमती लक्ष्मी मॅडम,वनोलकर मॅडम,वाघमारे, शेख,ममता कट्टलवाड, व इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
तेलंगाणा सीमे लागत असलेल्या अप्पारावपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वरील सर्व अधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र मंडगिकर,डॉ. विनोद बीजमवार,डॉ. सुशील वाडेकर व प्रार्थमिक आरोग्य केंद्र अप्पारावपेठ येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply