kinwat today news

शिक्षण आणि स्वास्थ्य हे दोन्ही विभाग दुर्लक्षित आहेत हे माझे कायम मत आहे- सुर्यकांता पाटील(माजी केंद्रीय राज्यमंत्री)

नांदेड: राज्यातील अनेक शाळा भरमसाठ फी वाढ करीत आहेत. गरिबांच्या मुला-मुलींना फी वाढीच्या भस्मासुरामुळे शिक्षण घेणे अवघड झाल्याचे चित्र आहे.या विषयी खंत व्यक्त करत माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील यांनी फेसबुक या समाजमाध्यमावर एका पोस्ट द्वारे आपले मत व्यक्त केले.
शाळेचा निकाल 100 टक्के
डोळ्यापुढे 36 वर्ष सरकली मी आमदार होते गावात भेटायला गेले तर पोरींनी वेढा घातला चिव चिवचिवणार्या चिमण्या गोंगाट करीत होत्या मी माझा ठेवणीतला सूर काढून गप्प केले आणि विचारले काय हवे तुम्हाला
त्यातली एक धीटपणे उभी ठाकली आणि बोलू लागली बोलता बोलता रडू लागली वृत्तांत असा त्यांना 8 वा वर्ग हवा होता. मुलींची शाळा हवी होती. 7वी पास झाले की आमची लग्ने होतात असा रुसवाही होता मी म्हटले बघते प्रयत्न करून शिक्षण मंत्र्यांना विनंती करून 8 वी ची मान्यता आणली इमारत नव्हती देवीच्या मंदिरातील ओसरी हिमायतनगर कराणी दिली 8 वी त 13 मुली आल्या आणि आमची शाळा सुरू झाली .
आता तो वट वृक्ष झालाय पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत तिथे शिकायला मिळते निकाल सर्वोत्तम असतात. ऍडमिशन च्या काळात मला लपून बसावे लागते .
फीस नसली तरी माझ्या मुलीला परीक्षेला बसू द्या असा आग्रह असतो. सरकार लक्ष्य देत नाही 12 वर्ष बिन पगारी काम करीत आहेत त्यांच्या आदेशाला सरकार निर्गमित करीत नाही. शिक्षण आणि स्वास्थ्य हे दोन्ही विभाग दुर्लक्षित आहेत हे माझे कायम मत आहे ।श्रीमंतांच्या शाळेची फीस कमी करू नका त्यांचे त्याना ठरवू द्या असे न्यायालय सांगते पण गरिबांची मुले शिकतात तिथे शिक्षक नाहीत याची चिंता कोणाचेही सरकार करीत नाहीं असो तरीही आमचा निकाल 100 टक्के सगळ्यांचे अभिनंदन ।

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply