kinwat today news

आँल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र महासचिव मा. प्रफुल्ल प्रकाश राठोड यांचा आज वाढदिवस

किनवट टुडे न्युज: मैत्री भाव जपणारा, नव- तरूणांना नेहमीच सकारात्मक बळ देणारा, जाणकार, संयमी व्यक्तीमहत्व पैलूंचे तथा आँल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र महासचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय मा. प्रफुल्ल प्रकाश राठोड यांचा आज वाढदिवस या निमित्तानं प्रा.सुरेश जाधव यांनी लिहलेले प्रासंगिक लेख देत आहोत.

बंजारा समाजाचे पहिले इतिहासकार मा. बळीराम पाटील यांच्या कार्य कृतृत्वामुळे बंजारा समाजातील ते एक महान महापुरुष आहेत. म्हणूनच *मांडवी या घराण्याच्या* अशा ऐतिहासिक पाश्र्वभूमीमुळेच या घराण्या बद्दल समाजात एक वेगळी ओळख व आस्था आहे. इतिहासकार मा. बळीराम पाटील यांच्या कुटुंबातील वारसदार मा. खा उत्तमरावजी बळीराम राठोड (पाटील ) साहेब हे हिंगोली मतदारसंघाचे तिन्ही वेळा खासदार तर काही काळ महसूल राज्यमंत्री म्हणून निस्वार्थी कार्य केले. तर या भागात मा. प्रकाशजी बळीराम राठोड (पाटील) साहेब यांनी या भागात मांडवी दरबारात न्यांयपंचायत चलवून अनेक पिडीतांना न्याय देण्याचे कार्य केले.अशी राजकीय, समाजीक, न्याय देणारे कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मांडवीच्या घराण्याच्या तिसर्‍या पिढीतील वारसदार मा. प्रफुल्ल प्रकाश राठोड यांनी आज स्व:ताचे एक वेगळा सम्राज्य निर्माण केले आहे. 17 व्या शतकात पासुन संपन्न असलेले हे घराणे होते. विशेष म्हणजे निजामशाहीच्या काळात सुद्धा मा. बळीराम पाटील यांची एक जमीनदार, उद्योगपती, व्यापारी ओळख होती. म्हणून बंजारा समाजातील असताना ही *त्यांना पाटील की पदवी* मिळाली होती. नंतर काळात *जेष्ठ समाज सेवक विनोबांनी भावे यांच्या भुदाण चळवळ निर्माण केली होती. या चळवळीला प्रेरित होऊन राठोड घराण्यांनी 2000 हजार एकर जमीन आदिवासी, बंजारा, दलित पद दलीतात मोठ्या मनाने दाण केली*.यांची दखल घेऊन *समाज सेवक विनोबा भावे यांनी मांडवी येथे स्वत:येवून भेट दिली होती*

निष्कलंक, निस्वार्थी माजी खासदार व मंत्री पद असणार्‍या घराण्यात कोणतीच खोटी माया जमवली नव्हती. त्यामुळे या नंतरच्या पिढीला कष्टाने वैभव निर्माण करावे लागेले असे म्हणावे लागेल. *मा प्रफुल्लजी राठोड यांची बळीराम पाटील मिशन मांडवी व किनवट शिक्षण संस्था किनवट चे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे ते मांडवी घराण्याचे वारसदार म्हणून मा प्रफुल्लजी राठोड यांच्याकडे पाहीले जाते*.किंबहुना या घराण्यांच्या विचार व कार्याचे वहण करणारे खरे वारसदार आहेत. परंतु मा. प्रफुल्लजी राठोड यांच्या प्रवास हा अनेक संकट, अव्हानाला स्वीकार करत संघर्षांशील अशा प्रवास राहीलेलं आहे.त्याच्या कौटुंबिक अडचणीत श्रीमंत मित्र व आप्तेष्टं हि भेटणे टाळायचे अशा अनेक प्रसंगाला त्यांना तोंड द्यावे लागले होते .लाहण पणा पासुन दंबग स्वभावाचे राठोड यांनी पुढे कै. बळीराम पाटील महाविद्यालय किनवट व रेणुका देवी महाविद्यालय, माहूर येथे कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतून तर पालीटेक्निक महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याचे काम करत आहे. त्यांचे हे शैक्षणिक संस्थान आदिवासी भागात उच्चशिक्षण देणारी संस्था म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच मा. प्रफुल्लजी राठोड यांनी SRTMU नांदेड विद्यापीठाचे 2 वेळेस सदस्य तर जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) सदस्य पदावर राहून कार्य केले आहे. आज मा. प्रफुल्लजी पासुन यांनी उद्योग, शैक्षणिक संस्था, राजकारण, समाजकारण एक वेगळा वलय- वैभव निर्माण केले. त्यांचावर कधी षडयंत्राने तर कधी राजकारणात आरोप – प्रत्यारोप असले तरी आज ही जनमानसाचा त्यांच्या भवतालीचा गरडा कधीच कमी झालेला नासतो. त्यामुळे सर्वसामान्यासी नाळ असणारा या नेत्यांचे किनवट /माहूत मतदारसंघात त्यांच्या आज ही दबदबा कायम आहे. एक अभ्यासू संघटनात्मक, संवेदनशील, हजरजबाबी, नेहमीच मिश्किल शब्दिक व्यंगकरणारे, इतरांच्या बेगडी हुलीयावर न भाळता चांगल्या माणसाची कदर करणारा, मैत्री भाव जपणारा, नव- तरूणांना नेहमीच सकारात्मक बळ देणारा, जाणकार, संयमी व्यक्तीमहत्व पैलूंचे तथा आँल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र महासचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय मा. प्रफुल्ल प्रकाश राठोड यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा…
– – – – – : शुभेच्छुक : – – – – –
प्रा सुरेश जाधव
राज्य सहसचिव, आँल इंडिया बंजारा सेवा संघ, महाराष्ट्र

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply