kinwat today news

शाहीर दौलत राठोड यांची बिकट परिस्थिती निवारण्यासाठी बंजारा संघटनांनी व नेत्यानी घेतला पुढाकार

किनवट (तालुका प्रतिनिधी)
दोन्ही पायाने अपंग असलेले बंजारा समाजातील सुप्रसिद्ध गायक शाहीर दौलत राठोड यांच्या कुटुंबावर लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली असून त्यांची ही बिकट परिस्थिती निवारण्यासाठी बंजारा समाजातील नेते व काही बंजारा संघटनांनी पुढाकार घेत 12 जुलै रोजी शाहीर दौलत राठोड यांच्या निवास्थानी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत एक छोटेखानी बैठक घेतली असून या बैठकीत शाहीर दौलत राठोड यांना अनेकांनी सढळहस्ते आर्थिक मदत देऊन त्यांच्या समाज प्रबोधनाला हातभार लावण्याचे काम केले आहे.

किनवट तालुक्यातील निराळा तांडा येथील रहिवासी असलेले शाहीर दौलत राठोड हे दोन्ही पायाने अपंग असून बंजारा समाजातील सुप्रसिद्ध गायक म्हणून परिचित आहेत.लॉक डाउन लागू होण्यापूर्वी अपंग असताना सुद्धा ते गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम नियमित करत होते. परंतु मागील दोन तीन महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे त्यांचे समाजप्रबोधनाचे काम देखील बंद पडले आहे. गायकी च्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र लॉकडाउनमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान त्यांच्यावर उद्भवलेल्या या बिकट परिस्थितीची काही बंजारा संघटनांनी व नेत्यांनी दखल घेतली असून शाहीर दौलत राठोड यांचा समाजप्रबोधनाचा वारसा यापुढेही सुरू ठेवण्याच्या दृष्टीने दिनांक 12 जुलै रोजी निराळा तांडा येथे त्यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी बैठक घेतली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निराळातांडाचे नाईक विठ्ठल नाईक होते तर तांडा वस्ती सुधार समितीचे नानाभाऊ जाधव, शेतकरी नेते मनोहर राठोड, सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजेरीवादक पंकजपाल महाराज, पृथ्वीराज चव्हाण, मोहन जाधव, नामदेव पवार, संतोष जाधव, रामेश्वर पवार, रोशन चव्हाण, पत्रकार दुर्गादास राठोड,विलास आडे,प्रा.जय.चव्हाण, प्रकाश चव्हाण, संजय पालतीया, आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत या बैठकीत विविध विषयावर चर्चा केली तसेच शाहीर दौलत राठोड यांच्यावर कोरोनामुळे उद्भवलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन शाहीर दौलत राठोड यांचा समाज प्रबोधनाचा वारसा यापुढेही बंजारा समाजाला लाभावा त्याचबरोबर त्यांचा उदरनिर्वाहही व्हावा या उद्दात हेतूने यावेळी शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी शाहीर दौलत राठोड यांना पाच हजार रुपयाचा धनादेश दिला त्याचबरोबर तांडा वस्ती सुधार समितीचे नामा भाऊ जाधव यांनी देखील आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. गायक दौलत राठोड यांना एक मुलगा व एक मुलगी असून यापूर्वी शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिल्याने त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. येणाऱ्या काळात परिवर्तनवादी विचार सरणीवर बंजारा गीते गायन करून समाज प्रबोधन करणार असल्याचे शाहीर दौलत राठोड यांनी यावेळी सांगितले या बैठकीचे आयोजन प्रा. डॉ. वसंत राठोड यांनी केले होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड धारणी, ग्रा.पं. सदस्य हरी राठोड, बाबुसिंग राठोड,बंडु जाधव, यांच्यासह निराळा तांडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीला शासनाच्या निर्देशाप्रमाणे सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply