kinwat today news

उमेद अभियानाच्या वतीने ग्रामीण भागात परसबाग तयार

नांदेड: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियान अंतर्गत माझे पोषण माझी परसबाग हा विकसन मोहीम सध्या सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून नांदेड तालुक्यातील बळीरामपूर, लिंबगाव, वाडी बु.वाजेगाव क्लस्टर मध्ये परसबाग तयार करण्यात येत आहेत ,आज पर्यंत वैयक्तिक १८० परसबाग व सामूहिक पद्धतीने काकांडी येथे डेमो नूट्री गार्डन तयार करण्यात आला आहे या मध्ये विकास महिला ग्रामसंघ काकांडी च्या पदाधिकारी या वेळी उपस्थित राहून मेहनत घेत आहेत…

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने २५ जून ते १५ जुलै २०२०
या २० दिवसात तालुक्यास २०५ चे उद्धिष्ट देण्यात आले होते त्या पैकी जवळपास सर्व उद्धिष्ट साध्य करण्यासाठी तालुका आणि जिल्हा कक्षाने अथक परिश्रम घेतले आहेत…
परसबाग म्हणजे घरासमोरील मोकळी जागा भाजीपाला फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या,इत्यादी दररोजच्या आहारात सहज उपलब्ध व्हावे त्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरोदर माता,स्थनदा माता,त्याच बरोबर आपल्या कुटूंबाला पौष्टिक आहार
यातून मिळावा म्हणून बचत गटाच्या माध्यमातून मोफत भाजीपाला उपलब्ध
कमी जागेत लवकर पिकणाऱ्या हिरव्यागार पालेभाज्या,वेलवर्गीय भाज्या दोडके,चवळी,काकडी,दुदगे, कारले,वांगे,भेंडी,टॉमेटो, मेथी,शेवगा इत्यादींचा समावेश आहे ,गटातील महिला सदस्यांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे ,आणि उरलेल्या भाजीपाला हे ग्रामसंघाचे उत्पन्न असेल प्रत्येक गावात हे पोषणबाग अभियान गतिमान करीत आहोत….
प्रा.इरवंत सुर्यकार, तालुका व्यवस्थापक,पंचायत समिती नांदेड यांनी कळविले आहे…

घरच्या परिसरातील मोकळ्या जागेत, किंवा शाळेच्या मोकळ्या परिसरात विकसित करीत आहोत,त्यापैकीच बाभुगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे ५०*५० एवढा परिसरात पोषण बाग लागवडीसाठी मा.गटशिक्षणाधिकारी श्री.रुस्तुम आडे सर यांनी जागा उपलब्ध करून दिली, लिंबगाव ,कासारखेडा, येथील शाळेत जागा उपलब्ध करून दिली…

स्वयं सहायता समूहातील महिलांनी ही परसबाग फुलविणार आहेत,गरोदर स्त्रिया,लहान बालके,किशोरवयीन मुली यांचं आरोग्यमान चांगलं राखण्यासाठी ही पोषणबाग महत्वाचा दुवा ठरणार आहे असे प्रतिपादन मा. व्ही. आर. पाटील ,प्रकल्प संचालक तथा अभियान सहसंचालक नांदेड यांनी मनोदय व्यक्त केला आहे..

सकस आहारात पालेभाज्या ह्या महत्वपूर्ण भूमिका बजावतात त्याकरिता प्रत्येक महिलांनी परसबाग लागवड करावी आणि त्याचा योग्य विनियोग करावा असे गटविकास अधिकारी श्री यू.डी. तोटावाड,पंचायत समिती नांदेड यांनी सांगितले,

या पोषणबाग लागवडीसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षयातील अधिकारी जिल्हा व्यवस्थापक ,श्री.गणेश कवडेवार,श्री.द्वारकदास राठोड, श्री.धनंजय भिसे,श्री.धनंजय देशपांडे,श्री.रमेश थोरात,श्री माधव भिसे ,श्री गजानन पातेवार आणि तालुका कक्षतील इरवंत सुर्यकार,आणि विकास महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष सौमित्रा लक्ष्मन पावडे , सचिव अंजना बागल,समूह संसाधन व्यक्ती शकुंतला जाधव , समूह संसाधन व्यक्ती इत्यादी परिश्रम घेतले आहेत….

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply