kinwat today news

कोविड केअर सेंटर किनवटला ग्राम पंचायत देहलीतांडाने दिले साठ हजार रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) : सोमवारी (दि.13 ) ग्राम पंचायत दहेली तांडाच्या वतीने येथील कोविड केअर सेंटरला सुमारे साठ हजार रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य देण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या उपाययोजनांतर्गत चौदाव्या वित्त आयोगातून वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेश सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिले होते. त्यानुसार गटविकास अधिकारी सुभाष धनवे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायत दहेली तांडाच्या वतीने किनवट येथील कोविड केअर सेंटरला पीपीई किट, मास्क, थ्रीलर मास्क, हँडग्लोज व ईतर साहित्य असे सुमारे साठ हजार रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले.
सरपंच राजेंद्र तोडसाम, उपसरपंच राजेश जाधव, ग्रामविकास अधिकारी दिगांबर चव्हाण यांनी गट विकास अधिकारी सुभाष धनवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, विस्तार अधिकारी ( आरोग्य ) विठ्ठल सिरमनवार यांचकडे सदरील साहित्य हस्तांतरीत केले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply