kinwat today news

संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर पाळावे -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

किनवट( तालुका प्रतिनिधी ) : कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या ‘ब्रेक द चैन’ संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर पाळावे असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शहरात फिरून नागरीकांना केले.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रविवारी ( दि. 12 ) दुपारी पाच वाजतापासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. यानुषंगाने तसेच गोकुंदा येथे आढळलेल्या बाधीतांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 13 ) सकाळी 11 वाजता तालुक्यातील सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांना प्रकल्प अधिकारी कार्यालय गोकुंदा येथे बोलावून उपविभागातील प्रत्येक गावात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना देऊन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल गोकूंद्यातून थेट किनवट शहरात दाखल झाले.
यावेळी त्यांनी मास्कचा वापर करणे, वारंवार साबणाने हात धुणे शारीरिक अंतर ठेवूनच बी-बियाण्याची खरेदी -विक्री करण्याचे कृषी सेवा केंद्रावरील शेतकऱ्यांना सांगीतले. विनाकारण फिरणा­ऱ्यांवर कारवाई करून दंड आकारण्यात यावा, तसेच नगर परिषद, तहसील, पोलीस विभागाला योग्य त्या सूचना केल्या. यावेळी तहसीलदार उत्तम कागणे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार कांबळे, गणेश पवार, पालिका अधिक्षक चंद्रकांत दुधारे, रमेश नेम्माणीवार, नगररचनाकार राहूल निकम, अभि.अभिजीत मिरकले, शेख अल्ताफ, तोफीक, सय्यद सिराज आदि अधिकारी -कर्मचारी शहरात फिरून संचारबंदीचे पालन करावे असे आवाहन करीत होते. पहिल्याच दिवशी किनवट उपविभागात, तालुक्यात व शहरात संचारबंदीला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply