kinwat today news

नियमांचे उलंघन करणारे विरुद्ध कायदेशीर कडक व दंडात्मक कारवाई – सह पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे मांडवी

मांडवी(इंद्रापाल कांबळे) मा.जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात दि.12 जुलै च्या मध्यरात्री पासून 144 कलमान्वये संचारबंदी लागू केली असून ती 20 जुलै च्या मध्यरात्री पर्यंत राहील. नांदेड जिल्ह्यात बऱ्याचशा तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण असले तरी किनवट तालुक्यातील मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नाही.मांडवी ला आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. परंतु येथील जनतेच्या सहकार्यामुळे येथे अद्याप कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तेव्हा मांडवी पोलीस स्टेशन च्या हद्दीत सर्व जनतेने सहकार्य मागे सहकार्य लाभले तसेच यापुढे ही सर्व जनतेला विनंती आहे की आपल्या हद्दीत करोना ला प्रवेश होऊ न देण्यासाठी विनाकारण प्रवास टाळा, प्रशासनास सहकार्य करा. नियमांचे उलंघन करणारे विरुद्ध कायदेशीर कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येईल. घरी राहा सुरक्षित राहा.असे आवाहन सह पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे मांडवी यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply