kinwat today news

किनवट तालुक्यातील काही शाळेनी शिक्षण विभागाच्या आदेशाला दाखविली केराची टोपली

किनवट – (ता. प्रतिनीधी) कोरोना संसर्ग लाँकडाऊन शिथील झाल्यावर राज्यात सर्व शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या ह्या सूचना दिनांक २४ जून रोजी सर्व शाळेला दिल्या असताना किनवट तालुक्यातील कांही शाळानी या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली असून सोशल डिस्टंसिंगचा फजा उडवत व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करीत सर्व शिक्षक शाळेत हजर राहण्याची सक्ती केली गेली आहे.
राज्यात कोरूना कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून शिक्षण विभागाने दिं. २४ जून च्या शासन निर्णयाच्या प्रतिष्ठान मध्ये शाळेत शिक्षकांना उपस्थित राहण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात ही बाब लक्षात घेऊन वर्क फॉर होम ची सवलत देण्यात आली होती. व महिला शिक्षिका, मधुमेह श्वसनाचे आजार असलेले रक्तदाब हृदयविकाराचे इत्यादी सारखे गंभीर असलेले शिक्षक व ५५ वर्षावरील पुरुष शिक्षक यांना शाळेमध्ये न बोलविता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याच्या कालावधी पर्यंत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात वर्क फार होम ची सवलत दिली गेली आहे. या व्यतिरिक्त शिक्षकांना एक किंवा दोन दिवस शाळेत आवश्यक वाटल्यास बोलवण्यात येईल व एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये असे स्पष्ट आदेश असतांंना सुद्धा किनवट तालुक्यातील काही शाळेनी शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पायमल्ली करीत असून या पायमल्ली मुळे जर एखाद्या शिक्षकाला कोरोना झाला तर याला जबाबदार कोण अशी चर्चा ग्रामीण भागातील गावकऱ्यांत केली जात आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply