kinwat today news

अमेय अनिलकुमार येरेकार याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड

किनवट : (आनंद भालेराव) सेंट मेरी’स इंग्लीश स्कूल, गोकुंदा येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अमेय अनिलकुमार येरेकार याची जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर, ता. बिलोली येथे इयत्ता सहावी मध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे.
या यशाचे श्रेय त्याने मार्गदर्शक धम्मपाल भवरे , शिक्षक,आई, वडील , भाऊ, बहीन यांना दिले. नवोदय प्रवेश परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, शिक्षण विस्तार अधिकारी ना.ना. पांचाळ, वसंत मेटकर, केंद्र प्रमुख रमेश राठोड, सेंट मेरी’स इंग्लिश स्कुलचे प्राचार्य फादर इग्नाथी, डॉ. राजेश कोमवाड ( नांदेड ), डॉ. दासरवार,चारूदत्त नेरकर ( खामगाव ), प्रविण धोटे ( नागपूर ), नितीन कॉंगे ( मेलबर्न ), केशव वाघमारे ( लातूर ), रामराव घुले, चंद्रकांत दमकोंडवार, गोवर्धन मुंडे, कृष्णा गीते, भुपेश नेम्माणीवार, सुनील गरड, राम बुसमवार, उत्तम कानिंदे, बाजीराव बुरकूले , मोहन जाधव, क्रीडा शिक्षक रमेश राठोड, दिलीप कांबळे, रामस्वरूप मडावी, समशेरर खान, नवनाथ कोरनुळे, रुख्मिणी मेश्राम आदिंसह त्याचे आजी -आजोबा, काका, मामा – मामी, भाऊ आदिंनी अभिनंदन केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply