kinwat today news

प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, महाराष्ट्र ( PTAM ) च्या शाखा किनवट ची नविन कार्यकारणी जाहीर.

किनवट:(आनंद भालेराव) किनवट येथील सर्व प्राईव्हेट कोचिंग क्लासेस चे संचालक व शिक्षकांनी एकत्र येऊन बैठकींचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये सर्वानुमते प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, महाराष्ट्र ( PTAM ) च्या शाखा किनवट ची कार्यकारणी गठीत करुन नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
सविस्तर वृत असे की, प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, महाराष्ट्र ( PTAM ) च्या शाखा किनवट ची जुनी कार्यकारणी बरखास्त होऊन देखील आजपर्यंत नविन कार्यकारणी गठीत झालेली नव्हती. त्यामुळे किनवट तालुक्यातील सर्व प्राईव्हेट कोचिंग क्लासेस च्या सर्व संचालकांनी व शिक्षकांनी मिळुन अॅम्बीशन कोचिंग क्लासेस, गोकुंदा या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरविण्यात आले की PTAM च्या शाखा किनवट ची नविन कार्यकारणी गठीत व्हायला पाहिजे. म्हणुन लगातार तिन दिवस अॅम्बीशन कोचिंग क्लासेस येथे बैठक घेऊन शेवटी तिसऱ्या दिवशी सर्वानुमते व सर्वांच्या सहमतीने नविन कार्यकारणी गठीत करून जाहीर करण्यात आली.
पि टी ए किनवट नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे, अध्यक्ष: जाकीर शेख सर, उपाध्यक्ष: केशर जयस्वाल सर व अशिष शेळके सर, सचिव: राजू हटकरे सर, सहसचिव: पाटील सर, कार्याध्यक्ष: सदाशिव जोशी सर व अमन सर, कोषाध्यक्ष: विनोद मुंडे सर, सहकोषाध्यक्ष: लक्ष्मण राठोड सर, सल्लागार: नागेश वैद्य सर व अरविंद राठोड सर, विशेष मार्गदर्शक: विजय राठोड सर, संघटक: मसलोद्दीन सर, सहसंघटकः बालाजी नागरगोजे सर, महीला संघटक: सौ.अनुराधा पांडे मॅडम, प्रसिद्धी प्रमुख: प्रशांत माहुरकर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख: सतिश गंगाधरे सर आणि सदस्य: अजय राठोड सर, प्रशांत कदम सर, शिवशंकर मुंडे सर, सतीश पाटील सर, सुर्यवंशी सर, योगेश कनकदंडे सर, विष्णू जाधव सर, शंकर शिंदे सर, सुरेश लोगमवार सर, निलेश भिलवडीकर सर, विशाल भंडारे सर, रणविर जाधव सर, राजू राठोड सर, शिंदे सर.
प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, महाराष्ट्र चे राज्याध्यक्ष मा. आर. बी. जाधव सर, जिल्हाध्यक्ष राजीव सुर्यवंशी सर व सदाशिव पालदेवाड सर यांच्या मार्गदर्शनानुसार बैठक पार पाडण्यात आली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply