अन्याय, अत्याचार निर्मूलन समिती जिल्हाउपाध्यक्ष पदी संतोष बोरूडे यांची नियुक्ती…!

श्रीरामपुर : अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्यकारणीत समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्रदादा जाधव नेतृत्वाखाली कोल्हार येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एस.आर.बी.न्यज चे संपादक संतोष बोरूडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्र देवुन जबाबदारी निश्चित करण्यात आली.श्रीरामपुर येथे आज नियुक्ती पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदारीने काम करण्याचे आश्वासन यावेळी संतोष बोरूडे यांनी दिले. यावेळी समिती च्या जिल्हाअध्यक्षा सौ.रमादेवी धिवर,युवक जिल्हाअध्यक्ष निखिल भोसले,जिल्हा सचिव मिलिंद धिवर,सौ.तेरेजा तेलोरे,श्रीरामपुर तालुका अध्यक्ष रितेश ऐडके दत्तात्रय कांदे,प्रविण ओहोळ आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.