kinwat today news

भाजपाच्या प्रदेश सचिव म्हणून अमितभाऊ गोरखे यांची ; अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेशअध्यक्षपदी आ. सुधाकर भालेराव यांची तर प्रदेश उपाध्यक्षपदी मा.सर्जेराव जाधव यांची निवड

किनवट: भाजपा प्रदेश कार्यकर्त्यांच्या निवडीच्या प्रक्रिया सुरू असून भाजपाचे नवीन प्रदेश सचिव म्हणून अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. अमितभाऊ गोरखे यांची निवड करण्यात आली आहे; अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेशअध्यक्ष पदी उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांची तर अनुसूचित जाति मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी मा.सर्जेराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
मातंग समाजातील या धडाडीच्या कार्यकर्त्यांची निवड भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाकडून व अनुसूचित जाती कडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नियुक्तीचा समाजाला नक्कीच फायदा होणार आहे.

*भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी सर्जेराव जाधव याची निवड –
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी घनसावंगी तालुक्याचे नेते तथा दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सर्जेराव जाधव याची निवड करण्यात आली आहे. देविदहेगाव येथील रहिवासी असलेले सर्जेराव जाधव हे दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यानी दलित महासंघावतीने संपूर्ण महाराष्ट्रात विशेष कार्य केले आहे म्हणून तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या घनसावंगी तालुका चेअरमन पदी निवड केली होती तसेच मंठा तालुक्यात जयपूर गटातून भाजपच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी जोरदार लढत दिली पंरतु त्याचा निसटता पराभव झाला होता तसेच त्यानी भाजप पक्ष मजबूत होण्यासाठी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील मातंग समाजाला भाजप जोडण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे त्यामुळे त्या ची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आहे सदर निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी पालकमंत्री बबनराव लोणीकर जिल्हाध्यक्ष संतोष दानवे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार विलासराव खरात यांनी अभिनंदन केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “भाजपाच्या प्रदेश सचिव म्हणून अमितभाऊ गोरखे यांची ; अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेशअध्यक्षपदी आ. सुधाकर भालेराव यांची तर प्रदेश उपाध्यक्षपदी मा.सर्जेराव जाधव यांची निवड

Leave a Reply