kinwat today news

राजगृहावरील हल्ला करणाऱ्यांना त्वरीत अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल – राजेंद्र शेळके.

किनवट:(आनंद भालेराव) विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’ वर दिनांक ७ जुलै रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आली. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडी शाखा किनवट तर्फे किनवट तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्त्वात त्या दोन आरोपींचा तातडीने शोध घेऊन तत्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे किनवट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.

निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. हे ठिकाण तमाम संविधान प्रेमी व भिम अनुयायींची अस्मीता आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे खुप महत्वाचे ठिकाण आहे.
पुढे बोलताना राजेंद्र शेळके म्हणाले की, राजगृहावरील हल्ला हा विकृत मनोवृत्ताचा भाग आहे की, मुद्दाम केलेले षडयंत्र आहे हे समजणे कठीण झाले आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार आणि ग्रंथासाठी घर बांधणारे जगातील एकमेव ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजगृह हे तमाम जगतातील मानवी जीवनाचे प्रेरणास्थान व आंबेडकरी समाजाचे श्रध्दास्थान आहे. यावर हल्ला होणे ही काही अनावधानाने घडलेली घटना नसावी. सदरील घटना ही भावनिक नसुन धोक्याची घंटा आहे जेंव्हा राजगृहा वर हल्ले होत असतील तर तुमच्या माझ्या सारख्या सामान्य आंबेडकरी माणसाच्या घरावर हल्ले तर कधीही होऊ शकतात म्हणुन आपल्याला वेळीच खबरदारी घेऊन एकत्र येऊन असल्या हल्ले करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच कायद्याने कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा भ्याड हल्ला करणारे जे कोणी विकृत मनोवृतीचे लोक आहेत, त्यांना त्वरीत अटक करावी, अन्यथा आंबेडकरी आनुयांयाच्या विद्रोहाचा बांध फूटेल हे सरकारने ध्यानी घ्यावे.
आज किनवट मध्ये जनता कर्फ्यु असल्याने आम्हि कायद्याचे पालन करत फक्त ५ जन येऊन निवेदन देत आहोत. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करून तत्काळ भीम अनुयायांच्या स्वाधीन करा अन्यथा लॉकडाऊन, कोरोना संसर्ग व जनता कर्फ्यु यांचा कसलाच विचार न करता आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा राजेंद्र शेळके यांनी दिला.
यांवेळी निवेदन देताना राजेंद्र शेळके, राहुल चौदंते, मिलींद वाठोरे, सम्राट कावळे व यशपाल मुनेश्वर आदि उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply