kinwat today news

प्रधानमंत्री गरीब कल्याणअन्न योजनेअंतर्गत स्वस्त धान्य लाभापासून 113 लाभार्थी वंचित दर महिन्यात 74 लाभार्थी स्वस्त धान्य लाभा पासून वंचित

मांडवी प्रतिनिधि/ इंद्रपाल कांबळे
मांडवी जिल्हा परिषद गट अंतर्गत कोठारी सिंद या गावात स्वस्त धान्य दुकान क्रमांक 94 आहे.या स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारक म्हणून 333 लाभार्थी पैकि 113 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मोफत तांदूळ योजनेतील लाभापासून 113 लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे. सदरील 113 च्या वचीताचे यादीचे नावे कोणी घेतली? ही यादी कोणी बनवली? त्यांना वंचित कोणी ठेवले? यांचे निकष काय? असे प्रश्न निर्माण झालेआहेत याचे कारण विचारले असता सदर शिधापत्रिकाधारक हे शेतकरी आहे व त्यांची नावे हे कोठारी शिंध ग्रामपंचायत ने दिले आहे असे स्वस्त धान्य वाटप करणारे दुकानदार यांनी सांगितले आहे यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालय कोठारी सिंद याना संपर्क केला असता या कार्यालयाने कोणतीही यादी देण्यात आलेली नसून या यादी चा काही संबंध नाही असे ग्रामसेवक यांनी सांगितले. सदरील स्वस्त धान्य दुकानदार यांची यादी कुणी दिली व यांचे नियम काय याबद्दल विचारणा केल्यास मला माहित नाही हे यादीवरून आली असे प्रभारी स्वत धान्य दुकानदार सगीतले याबद्दल अधिकविचारना केल्यास मला माहिती नाही मी प्रभारी असून धन्य वाटप करण्यासाठी आले आहे असे त्यांनी सांगितले 113 शिधापत्रिकाधारकांच्या नावे गावात लावून ही अपात्र यादी आहे व हे सर्व लाभार्थी अन्नधान्य उचलण्यासाठी दुकानात येऊ नये असे स्पष्ट लिहिण्यात आलेले आहे त्यांना धान्य वाटप होनार नाही कारण एपीएल 93 शिधापत्रिकाधारक म्हणून ज्यांची नावे आहेत त्यांना लाभार्थी आहेत ह्या एपीएल यादीमध्ये अनेक शेतकरी व गरीब यांचे नावे आलेल्या असून लाभार्थ्याची यादी मध्ये अनेक मोठमोठे शेतकऱ्यांची नावे आहेत. यामुळे यादी बनवण्यात पूर्णपणे संशय निर्माण होत आहे असे अपात्र लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. NPH या यादीमध्ये अनेकदा शेतकऱ्यांची नावे असून यामध्ये विधवा महिलेचे नावे असून त्यांना या गरीब अन्न अनुदान योजना पासून दूर ठेवण्यात आलेली आहे. या यादीमुळे विधवा, विधुर शिधापत्रिकाधारक याना वंचित ठेवण्यात आलेले आहे. अशाप्रकारे 113 लोकांची चुकीची यादी बनवून खऱ्या गरिबांना पंतप्रधानमंत्री अन्नधान्य योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत तर यादी बनवणारे जो कोणी असेल त्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी असे त्यांचे म्हणणे आहे.
अन्नधान्य वाटप संबंधात अधिक दुकानदाराची बोलले असता 333 शिधापत्रिकाधारक पैकी 259 लाभार्थ्यांची माल मिळालेले आल्याने सगीतले व 74 लाभर्थी यांचे धान्य मिळाले नाही असे सांगितले व या लोकांचे ठसे आले नाही या मुळे याना धान्य मिळणार नाही .या पुढे दर महिन्याला पण कोरोना विषाणु मुळे पास मशीन बन्द आहे त्यामुळे या लाभार्थचे अंगटे घेऊ शकत नाही असे सांगून त्यांनी परत धान्य मागण्यासाठी तहशील कायालयशी संपर्क साधावा असे उत्तर दिले. कोरोना विषाणु लागन होऊ नये म्हणून प्रशासनाने पास मशीन बन्द करुण त्या ठिकानी नोडलअधिका-याची नेमणूक केल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानाची धान्य वाटप करावे व नोडल अधिकारी नेमण्यात आलेल्या असता त्याना याविषयी बोलते केले असता कोणतेही यादी व मला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नसून चौकशी करून सांगतो असे नोडल अधिकारी यांनी सांगितले आहे.
दर महिन्यास 333 लाभार्थी चे धान्य उचल करुण 259 जनाना धान्य देऊं दर महिन्यास 70 ते80 शिधा पत्रिका धारकास स्वस्त धान्य लाभ पासून दूर ठेवले जात आहे . दर महिन्यास 20% माल हा कमी येतो व दुकानदार हा माल कमी का घेतो हा मोठ्या प्रश्र आहे .कोरोना विषाणूच्या काळा मधे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफत तादुळ वाटप व दर महिन्याच मिळणारे 74 शिधापत्रिकाधारकांची धान्य हे वेळीस पुढील महींया पासून नियमित वाटप करण्यात यावे लॉक डाउन च्या काळात शासन देतो पण प्रशासकीय गलथान कार्यभार मुळे गरीब शिधापत्रिका धारकास मनस्ताप सहन करवा लागत आहे. या मुळे जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी यानी प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतिल खरे लाभारत्यास न्याय द्यावे असी मागणी होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “प्रधानमंत्री गरीब कल्याणअन्न योजनेअंतर्गत स्वस्त धान्य लाभापासून 113 लाभार्थी वंचित दर महिन्यात 74 लाभार्थी स्वस्त धान्य लाभा पासून वंचित

Leave a Reply