kinwat today news

बोधड़ी वनपरिक्षेत्र मध्ये वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अंतर्गत अटल घन वन वृक्ष लागवडी ची सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते सुरुवात.

किनवट: आज बोधड़ी वनपरिक्षेत्र मध्ये वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अंतर्गत अटल घन वन वृक्ष लागवडी ची सुरुवात बोधड़ी खुर्द येथील राखीव वनात करण्यात आली.
याप्रसंगी किनवटचे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, प्रशिक्षणार्थी विभागीय वनाधिकारी कुमारी मधुमिता व किनवट चे तहसीलदार उत्तम कागणे यांच्या हस्ते वृक्ष रोपण ची सुरुवातकरण्यात आली.

बोधड़ीचे वन परिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांनी तांत्रिक रित्या रोपवन ची तयारी मागील दोन महिन्या पासून केली होती. सदर च्या रोपवन साठी बोधड़ी खुर्द चे वनरक्षक गणेश काळे व याकूब शेख वनपाल यांनी मेहनत घेतली.

या कार्यक्रमासाठी बोधड़ी वनपरिक्षेत्रतील कर्मचारी तसेच बाबुराव केंद्रे जिल्हा अध्यक्ष ओ बी सी आघाडी नांदेड, विवेक केंद्रे.भुरके बोधडी व पारडी चे ग्रामस्थ उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply