kinwat today news

पेट्रोल डिझेल विजबिल दरवाढीच्या विरोधात हिमायतनगर कॉंग्रेस कमीटीचे तहसीलदार यांना निवेदन.

हिमायतनगर प्रतिनिधी /राजु गायकवाड.
जग सद्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले असून उधोग अजून पूर्वपदावर आलेले नाही अश्या प्रसंगी पेट्रोल डिझेल च्या महागाईने आणि एक संकट जनतेवर ओढवले आहे या दुहेरी संकटाचा सामना करताना जनता व्यस्त आहे

7जून 2020पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून आजपर्यंतची वाढ पाहता पेट्रोल मध्ये प्रति लिटर 9.12रु तर डिझेल मध्ये 11.01रु वाढ करण्यात आली आहे देशभरात पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 88ते 90रुपये च्या जवळपास झाली आहे तर दिल्ली मध्ये डिझेल पेट्रोल पेक्षा महाग आहे आंतरराष्ट्रीय कच्या तेलाचे दर निच्याकी पातळीवर असताना त्यांचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्या तेलाचा विचार करून देशाअंतर्गत इंधनाचे दर ठरविले जात असताना सध्यातरी पारदर्शकता राहिलेली नाही वर्ष 2014 मध्ये पेट्रोल उत्पादन शुल्क हे 9.40रु तर डिझेल वर 3.56 रु होते सध्या हे शुल्क 32.98 रु तर डिझेल 31.83 रु असे आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्यांचा लाभ देणे सहज शके आहे सामान्य जनता दुहेरी संकटात असताना आपण लक्ष घालून जनतेला दिलासा दयावा या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी. काँग्रेस कमिटी ता अध्यक्ष. विकास पाटील देवसरकर. शहर अध्यक्ष संजय ग्यानोबा माने.सुभाष राठोड.मिर्झा बेग अखिल भाई.गजानन सुर्यंवशी.नासर पठाण.गणेश शिंदे.फेरोज भाई.
आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply