kinwat today news

किनवट शहरात मास्क न लावणाऱ्याना प्रत्येकी 200 रु दंड ;महसूल,पोलीस व न.पा.प्रशासनाची संयुक्त मोहीम;दोन दिवसात 79000 हजार दंड वसूल.

किनवट: नांदेड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत असून किनवट चा रहिवासी असलेला कर्मचारी हिमायतनगर येथे कोरोना पॉझिटिव झाला.त्यामुळे किनवट तालुका प्रशासन ऍक्टिव्ह झाले असून किनवट चे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट चे कर्तव्यदक्ष तहसीलदार उत्तम कागणे,किनवट नगरपालिका मुख्याधिकारी निलेश सुंकावार,किनवट पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली किनवट नगरपालिका क्षेत्रात मास्क लावता फिरणारे, मोटारसायकल वर डबल सीट फिरणारे,यांना थांबवून 200 रु दंड वसूल करण्यात आला.तसेच नागरिकांना लाऊसस्पीकर द्वारे सूचना करण्यात आल्या. या उपक्रमाचे किनवट च्या नागरिकांनी स्वागत करत प्रशासनास सहकार्य केले. किनवट मध्ये अन लॉकडाउन झाल्यानंतर तोबा गर्दी होत असून अनेक नागरिक कोरोना महा मारीला सहजतेने घेत असून प्रशासनाचे ही दुर्लक्ष झाले होते. अनेक नागरिक तोंडाला मास्क न लावताच फिरत आहे.तसेच सोशल डिस्टनसिंग चा तर फज्जाच उडाला आहे.

परंतु किनवट महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या चालवलेल्या या मोहिमेचा नागरिकांतून स्वागतच होत आहे.
दि6/7/2020 रोजी मास्क न लावल्याबद्दल 27 व्यक्ती कडून 4900 रु., सोशल डिस्टनसिंग बद्दल 3 व्यापाऱ्यांकडून 3000 हजार रु.तर दि 5/7/2020 रोजी 71,100 रु.असे एकूण 79000 हजार दंड वसूल करण्यात आला.
सर्व नागरिकांनी शासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच विनाकारण बाहेर पडू नये मास्क चा वापर करावा सोशल डिस्टेंससिंग चे पालन करावे.सॅनिटीझर चा वापर करावा असे आवाहन तहसीलदार उत्तम कागणे यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “किनवट शहरात मास्क न लावणाऱ्याना प्रत्येकी 200 रु दंड ;महसूल,पोलीस व न.पा.प्रशासनाची संयुक्त मोहीम;दोन दिवसात 79000 हजार दंड वसूल.

Leave a Reply