kinwat today news

सिंदगी येथील स्वस्त धान्य दुकांनाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा;नागरिकांनी दि.३जुलै रोजी तहसीलदार किनवट यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी

किनवट : (प्रतिनिधी)
शासनाने विना शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्याचे दहा किलो मोफत धान्य वितरण करायचे आदेशित केले असतांना एकाच महिन्याचा स्वत धान्य दिल्याने झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सिंदगी येथील नागरिकांनी दि. ३ जुलै रोजी तहसीलदार किनवट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थिती विचार करुन
केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्त सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत विना शिधापत्रिका धारकांना मे व जून या दोन महिन्यात स्वस्त धान एकदाच वितरीत करण्याच आदेशीत केले असतांना स्वस्त धान्य दुकानदार राम रतनसिंग राठोड यांनी एकच महिन्याचे राशन दिले आहे. त्यामुळे
सिंदगी येथील काही गावकरी दक्षता समितीचे सदस्य तथा पोलीस पाटील बालाजी वानखेडे यांच्याकडे तक्रार घेऊन गेले असता पोलीस पाटलांनाच स्वस्तधान्य दुकानदाराने तुमच्या ने काय होते ते करा, तहसिलदार यांच्या कडे तक्रार करा असे उद्धट भाषा वापरली.
तेव्हा गावातील स्वस्त दुकानदार राम रतनसिंग राठोड यांची चौकशी करण्याची नागरिकांनी विनंंती निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर मनोहर हेमसिंग जाधव, संजय संभाजी चेपटे, हेमसिंग मेघा जाधव, बंडू हेमसिंग जाधव, भागेरथा अंकुश बडेवाड, प्रकाश पीराजी वाडगेवाड,सोनी साईनाथ पिलवड ,राम बळीराम सातपुते, मारुती बळीराम सातपुते, संगीता भास्कर काकडे, अनिता रामराव पवार आद गावकर्‍यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply