kinwat today news

वैष्णवी गोरे खुन प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या.समाज बांधवाचे मुख्यमंत्र्यांना साकडे.

श्रीक्षेञ माहुर : जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी गोरे खुन प्रकरणातील आरोपीचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून त्याला अविलंब फाशीची शिक्षा देण्याची मागणी विविध संघटनेच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना दि. ३ जुलै रोजी पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

वैष्णवी गोरे ही अतिशय गरीब कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत.घरी अठराविश्व दारिद्रय असतानाही त्यांनी काही दिवसापुर्वी वैष्णवीचे लग्न लाऊन दिले. लग्ना नंतर माहेरी आलेल्या वैष्णवीवर आरोपी शेख अल्ताफ बाबु या नराधामाने भर बाजारात हल्ला करून धारदार शस्त्रानें तिचा निर्दयीपणे निर्घून खुन केला.त्याचे प्रकरण दृतगती न्यायालयात चालवून त्याला अविलंब फाशीची शिक्षा देण्याची मागणी अ.भा.माळी महासंघ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका माहूरचे वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री अनिल देशमुख,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचेसह सर्व संबधितांनाही पाठविल्या आहेत.
सुनिल बेहेरे, सुरेश गिऱ्हे ,कार्तिक बेहेरे ,सचिन बेहेरे, मल्हारी खामकर, धिरज बेहेरे, कपिल राऊत, समाधान बेहेरे,रविंद्र बेहेरे,दादाराव गायकवाड,पो.पा. प्रदिप सोनटक्के यांचेसह अनेक समाज बांधवाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. नायाब तहसीलदार व्यंकटेश गोविंदवार यांनी निवेदन स्वीकारून वरीष्ठ पातळीवर आपल्या भावना कळविणार असल्याचे आश्वासन दिले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “वैष्णवी गोरे खुन प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या.समाज बांधवाचे मुख्यमंत्र्यांना साकडे.

Leave a Reply