kinwat today news

पेट्रोल, डिझेलचे दरवाढ कमी करा;माहूर काँग्रेस कडून मागणी चे निवेदन तहसीलदारांना सादर.

माहूर: भरमसाठ वाढलेले पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माहूर चे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
जगात सध्या कोरोना महामारी ने जनता त्रस्त आहे या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहे उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाही बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपडत आहे रोजगार धंदे बंद आहे या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे दिनांक 7जुलै 2020 पासून इंधन मध्ये दररोज वाढ होत असून सामान्य जनता यांमध्ये होरपळून जात आहे.

सदरील दरवाढ कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी माहूर काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आली.
या प्रसंगी राजेंद्रजी केशवे मा.नगराध्यक्ष तथा विधमान नगरसेवक, संजय राठोड जि.प.सदस्य तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी माहूर, आनंद पाटील तुपदाळे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी माहूर, सौ अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, मार्केट कमिटीचे उपसभापती दिलीप मुनगीनवार, मार्केट कमिटीचे मा.उपसभापती तथा विधमान संचालक मंचकराव देशमुख,विश्वनाथ कदम,मा.प.स.सदस्य किशन राठोड, नगरसेवक इलियास बावाणी, न.प. चे मा.उपाध्यक्षअ.मुनाफ पटेल,न.प.चे मा.सभापती शिवलिंग टाकळीकर देवीदास मांजरमकर, सुभाष मार्गमवार, सुभाष क्षीरसागर, रेणुकादास वानखेडे,शेखआयुब शेख महेबूब, जगदिश पाटील तुपदाळे,मा.सरपंच प्रदीप जमदाडे,राजु सौंदलकर,नबी सहाब,सिद्धार्थ तामगाडगे, अब्दुलरफ सौदागर,दिपक मुरादे, अजिम सैयद, महंमद हानिफ भाई,निसार कुरेशी,करीम शहा,संजय गायकवाड, सचिन बेहेरे,आबीद खिच्ची, लक्ष्मण बेराडे,जमीर खान,अरविंद खंदारे, शेख जब्बार, शेख लुकमान,काशिनाथ खंदारे,देवीदास भोगाजी आडे,जब्बार भाई इत्यादी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “पेट्रोल, डिझेलचे दरवाढ कमी करा;माहूर काँग्रेस कडून मागणी चे निवेदन तहसीलदारांना सादर.

Leave a Reply