kinwat today news

भरमसाठ वाढलेले पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी करा;किनवट काँग्रेस कडून मागणी चे निवेदन तहसीलदारांना सादर.

किनवट: (3जुलै) भरमसाठ वाढलेले पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन किनवटचे तहसीलदार उत्तम कागणे यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
जगात सध्या कोरोना महामारी ने जनता त्रस्त आहे या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहे उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाही बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपडत आहे रोजगार धंदे बंद आहे या दुहेरी संकटाचा सामना करतांना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे .
दिनांक 7 जून 2020 पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून शनिवार पर्यंत ची दरवाढ पेट्रोलचे प्रतिलिटर भाव 9 रुपये 50 पैसे व डिझेलचे 11 रुपये 50 पैसे भाव वाढ करण्यात आली आहे.
सदरील दरवाढ कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी किनवट काँग्रेस पार्टी चे ता.अध्यक्ष सुर्यकांत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या प्रसंगी व्यंकटराव नेमानीवार,किशनराव किनवटकर,के.मूर्ती, सिराज जिवनी, अभय महाजन,गिरीश नेमानिवार,आशिष कऱ्हाळे, ईश्वर चव्हाण,माधव खेडकर,फारुख चव्हाण,लक्षमिपती दोनपल्लीवार,समशेर खिच्ची,के.स्वामी मूर्ती ,शरद दोनपेलीवार, फारुख बाबा,सत्तार खिच्ची,संजय कोतुरवार, जवाद आलम इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply