kinwat today news

शेतात काम असताना अचानक अंगावर वीज पडल्याने सुरेश जंगु कनाके चा जागीच मृत्यू


किनवट: किनवट तालुक्यात दुपारी दोन ते अडीच च्या सुमारास विजेच्या कडकडाटा सह मुसळधार पाऊस पडला यात सुरेश जंगु कनाके रा. मांडवा वय 21 वर्षे हा आदिवासी युवक त्यांच्या शेतात काम असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांनी लिंबाच्या झाडाचा आडोसा घेतला परंतु अचानक त्याच्या अंगावर वीज पडून सुरेश चा जागीच मृत्यू झाला.
सदरील घटना कळताच किनवटचे आमदार भीमराव केराम तहसीलदार उत्तम कागणे यांनी घटनास्थळी धाव घेतली व शोकाकुल परिवारांचे सांत्वन केले. माननीय आमदार भीमराव केराम यांनी नैसर्गिक आपत्तीत मृत सुरेश यांच्या परिवारास शक्य तेवढ्या लवकर शासकीय मदत देण्याबाबत तहसीलदार कागणे यांना सूचना केल्या
यावेळी गोवर्धन मुंडे, अनिरुद्ध केंद्रे, बालाजी पावडे, मारुती भरकड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सुरेश कनाके यांच्या पश्‍चात आई-वडील व तीन बहिणी आहेत. त्यांच्या मृत्यू मुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply