kinwat today news

डॉ व्हि.आर मेकाने उपसंचालक कुष्ठरोग विभाग नांदेड येथून नियत वयोमानानुसार 35 वर्ष सेवा यशस्वीपणे पूर्ण करुण सेवानीवृत

नांदेड: आज मा.डॉ व्हि.आर मेकाने उपसंचालक कुष्ठरोग विभाग नांदेड येथून नियत वयोमानानुसार 35 वर्ष सेवा यशस्वीपणे पूर्ण करुण सेवानीवृत झाले, आहेत.मा.डॉ.व्हि.आर.मेकाने साहेब यांनी मागील काळातील कठिण परिस्थितीवर मात करुण , उच्च शिक्षण घेऊन , MBBS पूर्ण केले आणि,येव्ढया मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत. त्यांच्या सर्व सेवाकाळात सामाजिक,शैक्षणिक, आंदोलने,मोर्चे आसतिल यात ते कधी प्रत्येक्ष कधी अप्रत्येक्षपने सह्भाग नोंदवलेला आहे.
सामाजिक चळवळीला नेहमीच खुल्या मनाने मदत राहिलि आहे.त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मा.व्हि.जे. वरवंटकर साहेब (माजी सनदी अधिकारी )यांच्या हस्ते त्यांना प्रेमाची शाल -हार घालून सत्कार करण्यात आला.पुढील आयुष्य सुखी समाधानी जावे आशी निसर्गचरणी प्रार्थना केली.त्यानंतर मा.बालाजी थोटवे (लसाकम ,प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र)यांनी ही त्यांच्या सर्व सेवाकाळाची अकोला,परभणी,हिंगोली,नांदेड़,मुक्रा-माबाद , सरसम, लिंबगाव,कावलगाव,या सर्व सेवेचा तपशील देत आठवण करुण दिली. आणि पुढील आयुष्यासाठी शुभकामना केली.
मा.नर्सिंग घोडके सर ,आज कांही कारना निमित्ताने नांदेड आले होते तेही सेवानिवृत्त झाले आहेत आम्ही लॉक डाउन मूळे लातूर जाऊ शकलो नाही म्हनुन आज लसाकम जिल्हा शाखा नांदेड़च्या ,वतीने घोडके सर यांचा यतोचित सन्मान प्रा.शिवाजी सूर्यवंशी सर यांच्या हस्ते केला. यावेळी मा.डॉ मेकाने साहेब यांनी आई नवजात मुल यांच्या सुरक्षिततेची योजना,कर्करोग तपासनी मोहिम,कुष्टरोग तपासनी मोहिम आशा बर्याच यशस्वीपणे योजना राबवल्याचे ते म्हणाले. सदर कार्यक्रमास मा.सुनिल सूर्यवंशि सर, मा.डी. डी.गायकवाड सर,मा.मधुकर गोंटे सर. या छोटे खानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ..संजय मोरे जिल्हासचिव लसाकम यानी केले तर आभार.माधव कांबळे यानी मानले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply