kinwat today news

बिलोली: पत्रकार संरक्षण समिती जिल्हा नांदेडच्या वतीने बिलोली तालुक्यात व शहरात कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनात सुरक्षा यंत्रणा व सामाजिक ,वैद्यकीय, तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योद्धाचा सन्मान करण्यात आला

बिलोली: पत्रकार संरक्षण समिती जिल्हा नांदेडच्या वतीने बिलोली तालुक्यात व शहरात कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनात सुरक्षा यंत्रणा व सामाजिक ,वैद्यकीय, तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योद्धाचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत,वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार,पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे, न. प. मुख्याधिकारी प्रशांत व्हटरकर,नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान, डॉ. ओमप्रकाश गोंड, माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार,नगरसेवक अनुप अंकुशकर,कोरोना ग्रूपचे इंद्रजित तुडमे,बजरंग दलाचे गजानन पांचाळ, अर्जापुरचे उपसरपंच लालूं शेट्टीवार,आरोग्य सेवक,रवींद्र गायकवाड,अधिपरिचरिका,सौ. कल्पना ठाकूर, आरोग्यसेवक शेख अर्शद, जेष्ठ पत्रकार अब्दुल गफूर कुरेशी,रत्नाकर जाधव,यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड, जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील,राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष रमेश तालीमकर यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचलन दैनिक देशोन्नतीचे पत्रकार शेख सुलेमान यांनी केले.तर याप्रसंगी दैनिक सत्यप्रभाचे पत्रकार संदीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदीप कटारे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.*

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply