kinwat today news

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व:-श्री.नरसिंगजी घोडके यांचा सेवानिवृत्तीबदल औसा शिक्षक पतसंस्थेतर्फे भावपूर्ण निरोप.

किनवट टुडे न्युज:(आनंद भालेराव ) औसा पंचायत समिती शिक्षण विभागातील जवळगा (पो) केंद्राचे उपक्रमशील केंद्रप्रमुख श्री.नरसिंगजी घोडके साहेब हे आपल्या नियतवयोमानानुसार दिनांक 31मे 2020 रोजी सेवानिवृत्त झाले.

शिक्षण क्षेत्रामध्ये काम करितअसताना स्वतःच्या कर्तुत्वावर,वक्तृत्वावर व नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून ठसा उमटविला. अत्यंत शांत स्वभाव,संयमी वृत्ती,अभ्यासु व चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व,स्वाभिमान गहाण न ठेवता ताठ मानेने जीवन जगणारे, शिक्षकांच्या व शिक्षणाच्या प्रश्नांसाठी नौकरीच्या शेवटपर्यंत लढा देणारे शिक्षण क्षेत्रातील श्री.नरसिंगजी घोडके साहेब हे एक *परीस* च होय.श्री.घोडके साहेबांच्या चारित्र्याची, गुणवत्तेची व आदर्शाची छाप संपूर्ण लातूर जिल्ह्यातील शिक्षक बांधवांना सदोदीत प्रेरणादायी असेल. जवळगा पोमादेवी केंद्रात त्यांनी राबविलेला इयत्ता पहिली 100% प्रगत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला.
कोरोणा रोगाच्या लाॅकडाऊन काळात श्री.घोडके साहेब सेवानिवृत्त झाले.औसा शिक्षक पतसंस्थेच्या डिजिटल संगणक खाते उतारा या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या उद् घाटन कार्यक्रमात आदरणीय श्री.नरसिंगजी घोडके साहेब यांना सेवानिवृत्तीबदल औसा शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. श्री.महादेव खिचडे यांचे अभूतपूर्व संघटनात्मक कार्य व औसा शिक्षक पतसंस्थेला घालून दिलेला पारदर्शक कारभाराचा आदर्श हे औसा तालुक्यातील शिक्षकांच्या जीवनातील सुवर्णयोग असे उद् गार त्यांनी आपल्या निरोपपर मनोगतातून व्यक्त केले.
श्री.घोडके साहेब यांना निरोगी जीवन व दीर्घायुष्य लाभो हीच पतसंस्थेच्या सभासदांच्या व संचालक मंडळाच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply