kinwat today news

किनवट शहरातील सुभाष नगर भागात अवैद्य सागवानांने भरलेला एक आटो जप्त

किनवट (आनंद भालेराव) .किनवट वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे किनवट शहरातील सुभाष नगर भागात अवैद्य सागवानांने भरलेला एक आटो जप्त करण्यात यश मिळविले आहे .वन विभागाचे पथक मागे लागल्याचे बघून ऑटो तील तस्करांनी मात्र ऑटो सोडून पोबारा केला . ही घटना आज दि. 30/06 रोजी सायं. 5:00 वाजता घडली .याबाबत सविस्तर वृत्त असे की किनवट वनपरिक्षेत्र अंतर्गत अवैद्य सामानाने भरलेला आटो शहरात येत असल्याची गुप्त सूचना किनवट वन विभागाला मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ सुभाष नगर च्या दिशेने धाव घेत अवैद्य सागवान कट साईजाने भरलेला आटो चा पाठलाग केला असता ऑटो तील तस्करांनी ऑटो सुभाष नगर भागात सोडून पळ काढला यावेळी किनवट वनविभागाच्या पथकाने अवैध्य सागी कट साईज नग वाहतूक करीत असलेला काळ्या पिवळ्या रंगाचा ऑटो ज्या मध्ये सागी नग क. सा. 11 घ.मी .0.0563 ज्याची अंदाजे माल किमंत 4000 /- इतका माल व ऑटो किंमत 30, 000 असा एकूण 34000/ एवढा ऐवज जप्त केला आहे .
सदर कार्यवाही नांदेड चे उपवनसंवरक्षक आशिष ठाकरे , सहाय्यक वनसंरक्षक किनवट व्ही .जी . गायकवाड यांच्या मार्गदर्शन खाली वनपरिक्षेञ अधिकारी के .एन . खंदारे वनपरिमंडळ अधिकारी के.जी. गायकवाड,सांगळे, संतवाले,डोईफोडे, वनरक्षक संभाजी घोरबांड,अरुण चुकलवर,सारगे, साईदास पवार, फोले, घायाळ, वैद्य, महिला वनरक्षक गायकवाड, मरसकोल्हे वाहन चालक बि. व्ही आवले, वनमजूर गरड मारोती, भावसिंग जाधव यांचा सहभाग होता.
वन गुन्हा वनरक्षक दिगडी (मंग.)यांनी या प्रकरणीनोंद केलाअसून ओळख पळून गेलेल्या आरोपी चा शोध वन विभागाकडून चालू असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी खंदारे यांनी सांगितले .

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply