kinwat today news

किनवट माहूर तालुक्यातील आमदार स्थानिक विकास निधीतून दिव्यांगा वर होणारा खर्च करण्यात यावा- राज माहुरकर यांचे निवेदन

किनवट 🙁 आनंद भालेराव) किनवट/ माहूर तालुक्यातील आमदार स्थानिक विकास निधीतून दिव्यांगा वर होणारा खर्च करण्यात यावा अशा विषयाचे निवेदन अखिल भारतीय अपंग कामगार संघटना चे सचिव राज माहुरकर यांनी तहसीलदार उत्तम कानिंदे व स्थानिक आमदार भीमराव केराम यांना सादर केले आहे.


या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की आमदार स्थानिक निधीतून दरवर्षी दहा लक्ष रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली असून दिव्यांगा लाभार्थी
अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर ,शारीरिक व मानसिक विकलांगता यांना विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.
तरी विधानसभा मतदारसंघातील आमदार मा.भीमराव केराम यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. त्याच्या निवेदनाची प्रत तहसीलदार किनवट यांना ही देण्यात आल्याचे राज माहुरकर यांनी सांगितले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply