किनवट: मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा व्या वतिने पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात किनवट येथे  निदर्शने

किनवट: केंद्र शासनाच्या पेट्रोल -डिझेल दरवाढी विरोधात मा.क.पा व्या वतिने विरोध करण्यात आले. मा.क.पा च्या वतिने आज देशभरात पेट्रोल -डिझेल दरवाढी विरोधात देशव्यापी आंदोलनांची हाक दिली होती.
मा.क.पा किनवट तालुका कमिटी च्या वतिने किनवट रोडवरील पेट्रोल पंप गोकुंदां येथे निषेध करण्यात आले.
अंतर राष्ट्रीय बाजारात पेट्रोल – डिझेल चे दर प्रती बेरेल कमी असतांना, मोदी सरकारच्या वतिने करण्यात आलेली हि दरवाढ अत्यंत अन्याय कारक आहे , देश आर्थीक अडचणीतून जात असतांना सर्व सामान्य जनतेवर अशा प्रकारे पेट्रोल – डिझेल दरवाढ जनतेवार लादने हे अत्यंत चुकीचे आहे ,सरकारने तात्काळ पेट्रोल – डिझेल दरवाढ वापस घ्यावे असे मत या वेळी मा.क.पा चे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.

पेट्रोल – डिझेल दरवाढी च्या विरोधात जोरदार घोणाबाजी यावेळी करण्यात आली,सोबत पेट्रोल – डिझेल दरवाढी च्या विरोधातील पोस्टर लिहून सरकारचे निषेध करण्यात आले ,आणि हि दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.