kinwat today news

हिमायतनगर: शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.प्रहार जन पक्षाची मागणी

हिमायतनगर/राजु गायकवाड
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना बँक अधिकारी कर्ज देण्यास नकार देत आहे. सन २२ मे २०२०रोजीच्या आदेशानुसार पात्र झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत.बैंक जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर बैकां शेतकऱ्यांना कर्जासाठी सतत्याने नकार देत आहे.मागील पेरणी केल्या होत्या परंतु ते बियाणे उगवलेच नाही शेतकऱ्यांनी आशा मोठ्या कोरोना रोगराई असताना देखील शेतात पेरणी केली होती. आता या शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्याची गरज आहे.बैंक अधिकारी शेतकऱ्यांना नकार देत असुन अधिक मानसिक छळ करुन संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना बैंकातुन हाकलून देत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही सहारा मिळणाशी झालेला आहे. संबंधित शेतकरी ज्या बैंकेचे ग्राहक आहेत त्या बैंकांनी संबंधित शेतकरयांना कर्ज देण्यास नकार देऊ नये.सहाय्यक निबंधक व तहसीलदार यांनी बैकांना आदेश द्यावे.
अन्यथा प्रहार जन पक्षा तर्फे स्टाईल आंदोलन करण्यात येईल.असे प्रहार जन पक्षाचे कार्याकरत्यांनी.सहाय्यक निबंधक संस्था हिमायतनगर येथे निवेदन देऊन सादर केला आहे.
यावेळी प्रहार जन पक्षाचे हिमायतनगर युवा अध्यक्ष विद्यानंद दिगांबर देवसरकर.प्रशांत वानखेडे.प्र.यु.ता.संघटक.रामराव शिंदे . गोविंद माने. प्रमोद वानखेडे.मोहन देवसरकर.अदी जन उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply