kinwat today news

किनवट:बोगस बियाण्याचे संकट राहिले उभे ;तालुक्यातील अनेक शेतक-यांनी पेरलेले सोयाबिन चे पिक उगवलेच नाही !

किनवट ता.प्र दि २८ खरीप हंगामाच्या पेरणी नंतर पावसाने दडी मारल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी चिंतातुर असतांना निसर्गाच्या या अवकृपे नंतर शेतक-यांसमोर बोगस बियाण्याचे संकट उभे राहिले आहे तालुक्यातील अनेक शेतक-यांनी पेरलेले सोयाबिन चे पिक उगवलेच नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे तर अनेक शेतकरी हताश झाले आहे या अनुषंगाने तक्रारी वाढत असल्याने काल दिनांक २७ जुन रोजी तालुक्यातील विविध दरसांगवी परिसरातील बांधावर सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल व तहसिलदार उत्तम कागणे यांच्यासह प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचा-यांनी भेट देऊन पाहणी केली.
       निसर्गाच्या अवकृपे नंतर बोगस बियाण्याचे संकट शेतक-यांसमोर उभे राहिल्या याच्या सर्व जिल्ह्यात तक्रारी झाल्या नंतर किनवट परिसरात देखिल शेतक-यांकडुन तक्रारी येण्यास प्रारंभ झाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कृषि अधिकारी गायकवाड यांना घेउन प्रत्यक्ष बांधावर पाहणी केली यावेळी दरसांगवी येथिल माधव सुर्यवंशी यांच्या शेतासह परिसरातील अनेक शेतांमधिल पेरणी झालेल्या बांधाची पाहणी करण्यात आली तर यावेळी बोलतांना सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले की प्रशासन पुर्णपणे शेतक-यांच्या पाठी असुन या आलेल्या संकटांना सामोरे जाण्याकरीता योग्य त्या उपायोजना वरिष्ठांकडुन आलेल्या सुचनांच्या आधारे करण्यात येतील. तर शेतक-यांनीही या बाबत न्याय मिळवुन देण्याची मागणी केली आहे तर यावेळी तहसिलदार उत्तम कागणे, ता.कृषी अधिकारी गायकवाड, कृषी सहाय्यक श्रीमती सरोदे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राठोड व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply